औरंंगाबाद : शेंद्रा एमआयडीसी परिसरातील बंद कंपनीत साफसफाईचे काम करित असतांना दोघांवर प्राण घातक हल्ला केल्याप्रकरणी चिकलठाणा पोलिसांनी मेहराज खान रशीद खान (वय २७, रा. उस्मानपुरा) याला तब्बल दोन वर्षांनंतर बेड्या ठोकल्या.
अदील नादेर पठाण (वय २५, रा. कटकट गेट नेहरुनगर) याने फिर्याद दिली. त्यानूसार, १ मे २०१९ रोजी आदील पठाण, आवेज खान, खालेद अबु तुराब हे तिघेही शेंद्रा एमआयडीसीतील बंद पडलेल्या नुर इंटरप्रायझेज कंपनीची साफसफाई करण्यासाठी गेले होते. कंपनीत साफसफाईचे काम सुरु असतांना रात्री साडेसात वाजेच्या सुमारास मेहराज खान, रिजवान रशीद खान व इतर चार ते पाच व्यक्ती कंपनीत आले.
त्यांनी कंपनीचे मालक खालेद भाई यांना शिवीगाळ करून मारहाण केली होती. यावेळी या टोळक्याने आदील पठाण व त्याच्या मित्राला देखील मारहाण केली होती. या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात मेहराज खान याच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘या’ बँकांमध्ये पैसे जमा करण्यास येऊ शकतात अडचणी; जाणून घ्या नवे नियम
- ‘राजकीय उद्देशातून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले’, नवाब मलिकांची टीका
- लसीकरण केंद्रावर जाणून परिस्थितीचा आढावा घेण्यास मोदी आपल्या सहकाऱ्यांना का सांगत आहेत ?
- रोहित शर्माने लोणावळ्यातील बंगला विकला अशोक सराफांच्या कुटुंबीयांना ; किंमत तब्बल ५.२५ कोटी
- ‘बातमीत राहायचे असेल शरद पवारांबद्दल खालच्या पातळीत बोला!’, आव्हाडांनी सांगितला उपाय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

