मुंबई : भारत आणि इंग्लंड दरम्यान कसोटी मालिका सुरु आहे. शनिवारी संपलेल्या लीड्स कसोटीत इंग्लंडने विजय मिळवत मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे. पुढील कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने संघाची घोषणा केली आहे.
लीड्स कसोटी विजयानंतर इंग्लंडने भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी संघाची घोषणा केली आहे. अपेक्षेप्रमाणे यष्टीरक्षक जोस बटलर संघाबाहेर झाला आहे. बटलरची पत्नी काही दिवसात बाळाला जन्म देणार आहे. या काळात पत्नीसोबत राहण्यासाठी त्याने पितृत्व रजा घेतली आहे. यामुळे भारताविरुद्धच्या आगामी सामन्यात जॉनी बेअरस्टो यष्टीरक्षकाची जबाबदारी पार पाडताना दिसेल.
Who's excited to see these players in the fourth Test against @BCCI? ????????????
???????????????????????????? #ENGvIND ????????
— England Cricket (@englandcricket) August 29, 2021
या व्यतिरिक्त संघात आणखी एक बदल झाला आहे. साकीब महमुदच्या जागी अष्टपैलु खेळाडू ख्रिस वोक्सचे संघात पुनरागमन झाले आहे. तर जोस बटलरच्या जागी सॅम बीलिंग्सचे संघात पुनरागमन झाले आहे. संघातील इतर खेळाडू कायम आहेत. ख्रिस वोक्सच्या पुनरागमनामुळे इंग्लंडच्या संघाची ताकद अधीकच वाढली आहे. चौथा कसोटी सामना २ सप्टेंबर पासुन ओव्हल येथे सुरु होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ऐसा कैसा चलेगा अनिल?’ ; भाजपच्या नेत्याने परबांवर डागले टीकास्त्र
- पुणे शहरात कोरोनाचे २०७ रुग्ण गंभीर तर २९८ रुग्ण ऑक्सिजनवर
- मोठी बातमी ! परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने धाडली नोटीस
- सर्वांना सोबत घेऊन मनात कोणताही मतभेद न ठेवता काम करेल- पैठण शहराध्यक्ष निमेश पटेल
- भाजप परभणी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरेंच्या गाडीवर हल्ला, कारवाईची मागणी


