Share

फडणवीस आणि मलिक या दोन्ही नेत्यांवरील आरोपांची चौकशी व्हायलाच हवी-नाना पटोले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यातील ड्रग्स प्रकरणावरुन सुरु झालेलं राजकारण आता अंडरवर्ल्डपर्यंत पोहचलं आहे. मलिकांनी ड्रग्स प्रकरणात देवेंद्र फडणवीसांवर आरोप लावले होते. त्यानंतर मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा दावा फडणवीसांनी केला होता. त्यानुसार फडणवीसांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत मलिकांचे १९९३ बॉम्बस्फोटातील आरोपींसोबत जमीन व्यवहार केल्याचे पुरावे समोर आणले. तेव्हा मलिकांनी मी हायट्रोजन बॉम्ब फोडणार असं म्हटलं.

नवाब मलिकांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करताना रियाज भाटी नावाचा उल्लेख केला. दोन पासपोर्ट बनवणाऱ्याला अटक केलेली असताना २ दिवसांत कसं सोडलं? असा दावा मलिकांनी केला. रियाज भाटी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमात त्यांच्या जवळ जाऊन फोटो काढतो असं म्हटलं. तर भाजपनेही रियाझ भाटीचे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसोबतचे फोटो प्रकाशित करून खळबळ उडवून दिलीये.

या सर्व घडामोडींवर काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘राज्यातील राजकीय परिस्थिती अतिशय भयानक बनली आहे. नेतेमंडळी एकमेकांवर गंभीर आरोप करत आहेत, ही राज्यासाठी लाजीरवाणी बाब आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री नवाब मलिक यांनी एकमेकांविरुद्ध केलेले आरोप गंभीर आहेत. त्यामुळे, या दोन्ही नेत्यांवरील आरोपांची चौकशी करायला पाहिजे’, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, काँग्रेस पक्षाची जनतेच्या आणि देशाच्या प्रश्नावर लढाई लढण्याची भूमिका आहे. आम्हाला कोणाच्याही व्यक्तिगत जीवनात रस नाही. जनतेचे मुळ प्रश्न घेऊन काँग्रेस लढत आहे. समीर वानखेडे प्रकरणात देखील आमची भूमिका ठाम होती. क्रुझ ड्रग्ज पार्टीतील सीसीटीव्ही फुटेज जाहीर करण्याची मागणी त्यावेळी आम्ही केली होती. मात्र एनसीबीने त्याबाबत कुठलंही फुटेज जाहीर केल नाही. आर्यन खान हाच फोकस त्यांनी ठेवला. केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर या प्रकारे हिंदू मुस्लिम वाद करुन महाराष्ट्रला मुंबईला बदनाम करण्याच काम भाजप सरकार करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!