Share

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे १४ ते १९ नोव्हेंबर दरम्यान राज्यव्यापी आंदोलन

Published On: 

मुंबई : केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर काही प्रमाणात कमी केलेत. मात्र, तरीही पेट्रोल आणि डिझेलचे दर सर्वसामान्यांना न परवडणारेच आहेत. त्यातच घरगुती गॅसचे दरही प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने परत एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारविरोधात आंदोलनाची घोषणा केलीय. १४ ते १९ नोव्हेंबर दरम्यान राज्यभरात विविध आंदोलनं करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

आमच्यासाठी जनतेचे प्रश्न महत्त्वाचे असल्याचे म्हटले. इंधन दरवाढ, वाढती महागाई, बेरोजगारी, शेतक-यांचे प्रश्न हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. आम्ही हे मुद्दे घेऊन आम्ही जनतेमध्ये जाऊन जनजागृती करून केंद्रातील मोदी सरकारविरोधात आंदोलन करणार आहोत, असे नाना पटोलेंनी सांगितले.

महागाई आणि इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसं जनजागरण अभियानाची घोषणा केलीय. जन जागरण अभियान म्हणून देश वाचवण्याचं आवाहन आहे. महागाई, बेरोजगारी आणि भाजपनिर्मित बरबादीच्या विरुद्ध आवाज बुलंद करण्याची घोषणा आहे. आपणही या, आमच्या जन जागरण अभियानाशी जोडले जा आणि देश वाचवा, असं आवाहन काँग्रेसकडून करण्यात आलं आहे.

तसेच एसटी कर्मचाऱ्यांचा संप सामोपचाराने मिटला पाहिजे. सणासुदीचे दिवस आहेत सर्वसामान्य जनतेला संपाचा त्रास होऊ नये ही सुरुवातीपासून काँग्रेस पक्षाची भूमिका राहिली आहे. सरकारने एसटी कर्मचा-यांच्या महागाई भत्ता, पगार यात वाढ करून त्यांच्या मागण्याही मान्य केल्या आहेत. पण, भाजप नेते एस टी कर्मचा-यांची दिशाभूल करत आहेत. आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी भाजप एसटीची कर्मचा-यांचा वापर करत आहे असे पटोले म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!