मुंबई : भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप कागदपत्रे दाखवून केला होता. त्यानंतर नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्डशी संबंधांचा हायड्रोजन बॉम्ब फोडण्याचा इशारा दिला. यावर मलिक यांनी आज फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा अनेक आरोप केले. त्यामध्ये, नोटाबंदीच्या काळात साडे १४ कोटींच्या बनावट नोटा सापडल्याचे प्रकरण फडणवीस यांनी दाबल्याचे मलिक यांनी दावा केला. यावर फडणवीस यांनी मलिकांच्या आरोपाला एका वाक्यात उत्तर दिले होते.
देवेंद्र फडणवीसांनी ट्विटमध्ये एक सुविचार शेअर केलाय. जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचा हा सुविचार आहे. ‘आपण डुकरासोबत कुस्ती खेळू नये, हे मी खूप पूर्वी शिकलोय. डुकरासोबतची कुस्ती आपल्याला घाण करते आणि तेच डुकराला आवडतं’, असा आशय त्या सुविचारात आहे. फडणवीस यांनी या ट्विटमध्ये कुणाचेही नाव घेतले नाही. पण मलिक यांच्या पत्रकार परिषदेनंतर फडणवीसांनी हे ट्विट केलंय. त्यामुळे, त्यांच्या या ट्विटचा निशाणा स्पष्टपणे नवाब मलिक यांच्याकडेच इशारा करत असल्याचे दिसून येते.
आता नवाब मलिकांची मुलगी निलोफर मलिकने फडणवीसांच्या त्याच टि्वटला उत्तर दिलं आहे. ‘आयुष्यात एक बळीचा बकरा शोधू नका. आपण केलेल्या चुकांची फळ भोगायला तयार राहा’ असं निलोफरने म्हटलं आहे.
Thought of the day : Stop looking for a scapegoat in your life, be willing to face the consequences and truth of your wrong doings. https://t.co/td4AJATvdT
— Nilofer Malik Khan (@nilofermk) November 10, 2021
तसेच अमृता फडणवीस यांनी नवाब मलिकांना ‘बिगडे नवाब’ म्हटलं होतं. त्यावरही निलोफर मलिक यांनी टि्वट करुन उत्तर दिलं. ‘कपाटामध्ये लपवलेले सांगाडे नसतील, तर त्यांना पत्रकार परिषदेची चिंता वाटणार नाही. जेव्हा तुमची सत्याची बाजू असते, तेव्हा क्वचितच तुम्हाला भीती वाटते. त्यांचा द्वेषपूर्ण हेतू असेल, तर ते उघडे पडतील. महाराष्ट्राची प्रगती आणि विकास हाच आमचा ध्यास आहे’ अशी टीका निलोफर मलिक यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मलिक साहेब, हायड्रोजन सोडा आता तुम्हाला ऑक्सिजनची गरज लागेल’
- भाजपा नेते एसटी कर्मचाऱ्यांना चिथवून गलिच्छ राजकारण करत आहेत-सचिन सावंत
- ‘नवाब मलिक यांचं डोकं ठिकाणावर नाही, त्यांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज’, दरेकरांचा टोला
- ‘बिगडे नवाब’ म्हणणाऱ्या अमृता फडणवीसांना मलिकांच्या मुलीचं सडेतोड उत्तर
- समीर वानखेडेंच्या औरंगाबादेतील आत्याची मलिकांविरोधात तक्रार, एट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

