गोंदिया : गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील गावांना पुराने वेढले अन असंख्या कुटुंबांची एका रात्रीत वाताहात झाली. काय करायचे कळत नाही, नेते आले नेते गेले पण स्थिती अधिकच गंभीर होत चाललेली. अशात जिल्ह्यातील रहिवाशीयांचे दुर्दैव असे कि, इतके मोठे संकट असताना पालकमंत्र्यांना अद्यापही गावातील नागरिकांशी साधा संवाद साधण्याचीही उसंत मिळालेली नाही.
आज पालकमंत्री आमचे दुःख समजून घेऊ शकत नाही काअसा प्रश्न आता गोंदियावासियांना पडलेला आहे, चिडलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांना यापुढे दौरा करू देणार नाही असा निर्णय देखील घेतला आहे.भाजप किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय टेंभरे यांनी हि माहिती दिली आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे गृहमंत्री असलेले ना.अनिल देशमुख हे १३ सप्टेंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग थैमान घातले असून जिल्ह्यात पूर परिस्थिती ही बिकट झाली होती. राज्याचे गृहमंत्री या नात्याने मंत्रिमंडळात त्यांचे वजन आहे. त्यामुळे जिल्ह्याला त्याचा फायदा होईल, अशी आशा होती. मात्र पालकमंत्री सायंकाळी जिल्ह्यात दाखल होऊन अंधारात आढावा घेऊन पहाटे पहाटे परतले.
त्यांच्या मुळे जिल्ह्यातील शेतकर्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र त्यांनी त्याचा अपेक्षाभंग केल्याचे जाणवत आहे. पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्राची चमू जिल्ह्यात येऊन गेली मात्र पालकमंत्र्यांना जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी काही देणे घेणे नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे आपण या दौऱ्याचा निषेध करीत असून पालकमंत्र्यांचे जिल्ह्यातील शेतकऱ्यांप्रती असेच धोरण असेल तर पुढील दौऱ्याच्या वेळी आपण शेतकऱ्यांसह त्यांना घेराव घालून याचा जाब विचारणार असल्याचा इशारा भाजप जिल्हा किसान आघाडीचे अध्यक्ष संजय टेंभरे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- आपल्याला कोरोनाची लागन झाली तर बेड्स मिळावेत, यासाठी आधीच श्रीमंतांनी बेड आरक्षित करून ठेवले आहेत
- कांद्यावरील निर्यात बंदी लवकरात लवकर हटवा- निलेश लंके
- आदिवासी भागातील विद्यापीठाचे मॉडेल आवडले उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांना… नक्की वाचा काय आहे हे मॉडेल!
- राज्यात सप्टेंबर अखेर शाळा सुरू होणे अवघडच; शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
- मुस्लिम समाजाला तातडीने आरक्षण द्या!


