Share

आपल्याला कोरोनाची लागण झाल्यास बेड्स मिळावेत, यासाठी आधीच श्रीमंतांनी बेड आरक्षित करून ठेवले आहेत

Published On: 

नागपूर : नागपूरात खाजगी रुग्णालयातील बेड्स श्रीमंतांनी अडविल्याची धक्कादायक माहिती पुढं आलीय. खुद्द महापौर संदीप जोशी यांनी हे वास्तव मान्य केलंय. नागपूरात कोरोना रुग्णांची स्थिती स्फोटक आहे. कोरोना रुग्णांचा आकडा 53 हजारावर गेला आहे. सरकारी आणि खाजगी रुग्णालयात बेड्स उपलब्ध नसल्यामुळे उपचाराअभावी रुग्णांचा जीव जातोय. याचीच भीती बाळगून काही श्रीमंतांनी ‘आपल्याला कोरोनाची लागन झाली तर बेड्स मिळावेत, यासाठी खाजगी रुग्णालयातील बेड्स आरक्षित करून ठेवले आहेत. त्यामुळं गंभीर रुग्णांना बेड्स मिळत नसल्याचं चित्र आहे.

दुसरीकडे रुग्णांवर उपचार करणाऱ्या तीन हजार डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. महापालिकेच्या मुख्य आणि झोनल कार्यालयातील अनेकांना कोरोनाची लागण झालीय. त्यामुळं शहरातील कोरोना विरुद्ध लढणारी यंत्रणा कोसळली आहे. त्यामुळं आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढलेला आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी जबाबदारीनं वागून, नियमांचे पालन करावे, असं आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.

पहा व्हिडिओ :

https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/371339197587309/

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!