मुंबई : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे मेहबुब शेख यांच्यावर एका पीडितेने अत्याचाराचे आरोप केले होते, या प्रकरणात आता पीडितेने नवा खुलासा केला आहे. या प्रकरणाने आता एक नवे वळण घेतले आहे. या प्रकरणातील पीडितेने भाजप नेत्या चित्रा वाघ आणि भाजप आमदार सुरेश धस यांच्यावरच आरोप केला आहे.
भाजपच्या चित्रा वाघ आणि सुरेश धस यांच्या सांगण्यावरून खोटा गुन्हा दाखल केल्याच पीडित तरुणीने आरोप केला आहे. चित्रा वाघ आणि सुरेश धस यांनी आपल्याला शेख यांच्याविरोधात तक्रार द्यायला भाग पाडले, असा गुन्हा तरुणीने औरंगाबादच्या जिंसी पोलीस ठाण्यात दखल केला आहे. ज्यात एफआयरमध्ये सुरेश धस आणि चित्रा वाघ यांची नावे आहेत.
यानंतर आता या प्रकरणावर चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजकारणात काम करताना अशा घटना किंवा अनुभव नवीन नाहीत. आम्ही पहिल्या दिवसापासून मुलीला मदत केली आहे. तपास यंत्रणांना जिथे बोलावेल तिथे जाऊन सहकार्य करू. अशा अनुभवांमुळे आम्ही काम करणे थांबवणार नाही. आम्ही काम करत राहू. ज्या ठिकाणी अशी राजकीय खलबते होतात तेथे अशा समस्या निर्माण होणे स्वाभाविक आहे याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे अशा समस्यांना तोंड देण्याची आमची तयारी आहे, असे चित्रा वाघ यांनी सांगितले.
NCP चा मेहबूब शेखने माझ्यावर बलात्कार केला मला मदत करा असं आमच्याकडे सांगत आलेल्या पिडीतेने घुमजाव करत गुन्हा दाखल करण्यास आम्हीचं भाग पाडलं म्हणत तक्रार केलीये हे आताचं माध्यमातून कळलयं
ज्या केसेस मध्ये राजकीय धेंड असतात तिथे असं होणं अगदी स्वाभाविक सगळ्या चौकशींना मी तयार आहे pic.twitter.com/SqQgpcVrcY