Share

‘ओ..घुंगरू सेठ…तुम्ही किंमत चुकवलीये थेट’, चित्रा वाघ यांचा राऊतांवर हल्लाबोल

Published On: 

मुंबई : काल माध्यमांशी संवाद साधतांना केंद्रीय तपास संस्थांच्या महाराष्ट्रातील कारवायांवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत ‘सत्तेसाठी काहीही करायचं, केंद्रीय तपास संस्थांचा अमर्याद गैरवापर करायचा, महाराष्ट्रात केंद्रीय संस्थांचा दुरुपयोग लोकशाही संकेतांना धरून नाही. शरद पवार यांनी सांगितलंय की तुम्हाला याची किंमत चुकवावी लागेल. या देशाची जनता कधीच कुणाला माफ करत नाही हे आपण इंदिरा गांधी यांच्या काळातही पाहिले आहे’, असे राऊत म्हणाले होते.

राऊत यांच्या या वक्तव्यावर भाजप नेत्या चित्रा वाघ आक्रमक झाल्या असून यासंदर्भात त्यांनी ट्विट केले आहे. ‘पापाची किंमत चुकवावी लागणार असल्याची भाजपला धमकी देणा-या संजय राऊत यांनी आधीच आपल्या पापाची किंमत #ईडी कडे चुकवलीय… तब्बल ५५ लाख रूपये. ओ..घुंगरू_सेठ.. तुम्ही किंमत चुकवलीये थेट’, असे ट्विट करत चित्रा यांनी राऊतांवर टीकास्त्रांचा प्रहार केला आहे.

दरम्यान, छगन भुजबळ यांना नंतर क्लिनचिट मिळाली. मग त्यांनी इतका काळ जो तुरुंगात घातला त्याचं काय? त्याची भरपाई कोण करणार? पवार कुटुंबीय, मी, अनिल देशमुख, छगन भुजबळ, अनिल परब, प्रताप सरनाईक असे फक्त आम्हीच तुम्हाला दिसतोय का? भाजपात किंवा त्यांच्या चमचामंडळात सगळे धुतल्या तांदळासारखे आहेत का? आम्ही तुम्हाला घाबरत नाही, कारण आमचं काहीच पाप नाही. तुम्ही पापी लोकं बुरखे घालून फिरता आणि आमच्यावर आरोप करत चिखलफेक करता. याची किंमत भाजपाला चुकवावी लागेल.’ तसेच आम्ही जो त्रास भोगलाय त्या प्रत्येक सेकंदाची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल. नियती कुणालाही माफ करत नाही, असेही राऊत म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!