🕒 1 min read
मुंबई : आगामी महापालिका निवडणूक तयारीसाठी मुंबईतील भाजपचे जिल्हाध्यक्ष, बूथ प्रमुख व अन्य नेत्यांची बैठक विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी भाजप शिवसेनेच्या बळावर जिंकते, हा शिवसेनेच्या भ्रमाचा भोपळा २०१७ च्या महापालिका निवडणुकीत फुटला, अशी टीका फडणवीसांनी केली.
यावेळी बोलत असतांना फडणवीस म्हणाले की,’महाविकास आघाडी सरकार करोना काळात कसे अपयशी ठरले, हे जनतेने पाहिले आहे. या संकटकाळात महापालिकेतही मोठा भ्रष्टाचार झाला आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला होता. भाजपला शिवसेनेच्या बळावर विजय मिळतो, हा शिवसेनेचा भ्रम महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत दूर झाला आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, यावेळी मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आमदार अमित साटम, मिहीर कोटेचा, पराग अळवणी व अन्य पदाधिकारी नेते उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या:
- हे तर असं झालंय की मांजर कधीच उंदीर खातं नाही- अनिल बोंडे
- मेल्ट्रॉन प्रकरणातील एक पॉझिटिव्ह रुग्ण सापडला; एक अजूनही फरार..
- मुस्लिम आरक्षणाबाबत ओवेसींनी ठाकरे सरकारकडे केली ‘ही’ मागणी
- ‘ज्या राज्यात भाजप सरकार नाही तिथेच…’; अनिल बोडेंचं खळबळजनक वक्तव्य
- एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्यासाठी परिवहन मंत्र्यांचा अल्टीमेटम


