मुंबई : एसटी कामगारांच्या संपावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
लेखात राऊत म्हणाले आहेत की,’एस .टी. कर्मचाऱ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्या आहेत. न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर चर्चा वगैरे होऊन इतरही प्रश्न भविष्यात मार्गी लागतील. तरीही भारतीय जनता पक्षातले लोक संपास चिथावणी देण्याचा प्रयत्न करीत आहेत. साताऱ्यात एस.टी. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास हिंसक वळण लागले. सातारा आगारातून एस.टी. बस बाहेर काढणाऱ्या चालकांना भाजप समर्थकांनी हाणामारी केली. अशा घटना आता अन्य ठिकाणी घडू लागल्या आहेत. हे भाजपचे वैफल्य म्हणायला हवे. मुंबईतील आझाद मैदानावर एस.टी. कामगारांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. त्या ठिय्या आंदोलनात भाजपचे नेते घुसतात व शेवटपर्यंत लढण्याच्या गर्जना करून आपापल्या घरी आरामात झोपतात. कर्मचारी मात्र तेथे मच्छर, दगडधोंडय़ांच्या सहवासात बसून आहेत. त्या ठिय्या आंदोलनात भाजपनेही सात-आठ दिवस पथारी पसरलीय असे दिसत नाही. म्हणजे ‘लड़ने को तुम और भाषण को हम’ असेच त्यांचे चालले आहे.’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’महामंडळाचे विलीनीकरण शक्य नाही, असे सरकार सांगत आहे तेव्हा त्यास कायदेशीर आधार आहे. भारतीय जनता पक्ष या विषयावर कामगारांची डोकी भडकवून काय साध्य करणार आहे? कामगारांचा संप मोडावा किंवा फुटावा असे सरकारचे धोरण दिसत नाही, पण चर्चेतून मार्ग निघावा हेच सगळय़ांचे म्हणणे आहे. अशा आडमुठय़ा धोरणांमुळे मुंबईतील अडीच लाख गिरणी लागला हे वास्तव आहे’, असेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- ‘शिवसेनेच्या भ्रमाचा भोपळा २०१७ मध्येच फुटला’, फडणवीसांचे टीकास्त्र
- मुंबै बँक घोटाळ्याप्रकरणी दरेकरांना अंतरिम दिलासा; २ डिसें.पर्यंत कारवाई न करण्याचे पोलिसांना आदेश
- ‘भाजप नेत्यांमुळे संपकऱ्यांची कोंडी’, संजय राऊतांचा हल्लाबोल
- ‘ओ..घुंगरू सेठ…तुम्ही किंमत चुकवलीये थेट’, चित्रा वाघ यांचा राऊतांवर हल्लाबोल
- एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्यासाठी परिवहन मंत्र्यांचा अल्टीमेटम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

