जालना : जालन्यामधील कुंडलिता तसेच सीना नदी स्वच्छ करण्याचे काम आजपासून पुन्हा प्रत्यक्ष सुरू करण्यात आले आहे. पावसाळ्याच्या पुर्वी नदीची साफसफाई करण्याच्या कामाला आता वेग येणार आहे.
दरम्यान समस्त महाजनच्या विश्वस्त नूतन देसाई यांनी कुंडलीता तसेच सीना नदीच्या स्वच्छतेसाठी पोकलेन तसेच जेसीबी यंत्र उपलब्ध करून दिले आहेत. या नदीच्या स्वच्छतेचे काम सातत्याने पाच वर्षांपासून सुरूच आहे. दरवर्षी पावसाळ्यापुर्वी नदीची स्वच्छता करण्यासाठी समाजातील विविध स्तरातील व्यक्ती ही स्वच्छता करण्यासाठी पुढे येत आहेत. तर पाच वर्षापुर्वी या दोन्ही नद्या स्वच्छ करण्यासाठी नागरिक स्वत: हून पुढाकार घेत आहेत. त्यामुळे आता आपल्याला या पुढे नदी स्वच्छ करण्याचे काम करावेच लागणार असल्याचे मत या वेळी जालन्याचे जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी व्यक्त केले.
सोमवारी सकाळी जालन्याच्या नगराध्यक्षा, आमदार, नगर परिषद मुख्याधिकारी, नगरसेवक, नगर परिषद अधिकाऱ्यांसह कर्मचारीवर्ग उपस्थित होते. तर या वेळी जालन्यात विविध सामाजिक तसेच सांस्कृतीक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्था आणि पर्यावरण प्रेमी, नागरिक, उद्योजक, डाॅक्टर, वकील, प्राध्यापक, पत्रकार, व्यापारी तसेच पोलीस, सर्वच राजकीय पक्षातील नेते व कार्यकर्ते यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. यावेळी जेसीबीची पूजा करून प्रतिकात्मक पद्धतीने काम सुरू केले आहे. या वेळी अनेक नागरिक व संस्था या स्वच्छतेच्या कामामध्ये अग्रेसर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
- ‘जे ऍक्टर होऊ इच्छितात त्यांनी ‘हे’ शिकावं’
- संसर्ग वाढतोय आता लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही – बाळासाहेब थोरात
- ‘ब्रेक द चैन’मुळे प्राजक्ता उदास, लिहिली ‘ही’ पोस्ट
- कामगारांची कोरोना तपासणी न केल्याने मेडिकल व्यावसायिकांना दंड
- शरद पवार यांच्या पित्ताशयावर यशस्वी लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया ;तब्येत स्थिर – नवाब मलिक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

