मुंबई : प्राजक्ता माळी सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असते. ती नेहमीच तिचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. तिचे चाहते देखील तिच्या या फोटोंवरती भरभरून कंमेंट करत असतात. मात्र, प्राजक्ताचा सध्या मूड चांगला दिसत नाहीये. नुकताच तिने एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून ती एका गोष्टीला प्रचंड मिस करणार असल्याचे म्हणत आहे.
प्राजक्ताने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, सेल्फी, नो फिल्टर वगैरे सगळं आहेच… पण महत्वाचं म्हणजे योग शाळेत जाऊन अष्टांग साधना करणं आणि इतर अनेक गोष्टी मी पुन्हा मिस करणार… पण सगळ्यांनी स्वतःची अधिकाधिक काळजी घ्या आणि मास्क घाला… ब्रेक द चैन… प्राजक्ताच्या या कॅप्शनने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
प्राजक्ता माळीने आपल्या सुंदरतेने तसेच आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. प्राजक्ताच्या अभिनयावर तिचे चाहते फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने अल्पावधीतच रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.
महत्वाच्या बातम्या
- वेंकटेश प्रसादच्या उत्तराने पाकिस्तानी ट्रोलरची बोलती बंद
- डेव्हीड वॉर्नरच्या ‘या’ चुकामुळे झाला हैदराबादचा पराभव
- राज्यात कडक लॉकडाऊन लागणार ? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची आज महत्वाची बैठक
- आजचा सामना राजस्थानविरुद्ध पंजाब
- पांडेवर भारी नितीशचा डाव ; कोलकाताने हैदराबादला 10 धावांनी केले पराभूत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

