मुंबई : अभिनेता सोनू सूद कोरोना काळापासून बराच चर्चेत आला आहे. लोकांची मदत करण्यापासून ते सोशल मुद्दयांवर भाष्य करण्यापर्यंत कायमच ह्या ना त्या कारणाने चर्चेत असतो. यावेळीही तो चर्चेत आला आहे. मात्र यामागचे कारण लोकांना मदत करणे नव्हे तर दुसरेच आहे. होय सोनू सूदचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हयरल होत आहे.या व्हिडिओत चाहत्यांना सोनूचं वेगळंच रुप पाहायला मिळत आहे.
सोनूने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. यात तो डोसा बनवताना दिसत आहे. त्याने या व्हिडिओला ‘डोसा टाईम’ असं कॅप्शनही दिलं आहे. या व्हिडिओत तो म्हणतो, “तुम्ही खूप डोसा खाल्ला असेल पण हा भारतातला सर्वात चांगला डोसा आहे. खायला तयार व्हा.”
चित्रीकरणाच्या सेटवर सोनू डोसा बनवत आहे. तो म्हणतो, “ज्या कलाकाराला डोसा बनवता येतो त्याला निर्माते पसंती देतात. कारण मग त्यांचा खाण्यापिण्याचा खर्च वाचतो. कलाकार स्वतःच स्वतःसाठी बनवेल आणि खाईल. त्यामुळे जे ऍक्टर होऊ इच्छितात, त्यांनी स्वतःसाठी डोसा बनवायला शिकावं.” असही सोनू त्या व्हिडिओमध्ये म्हणाला आहे. सोनू सूदच्या या व्हिडीओचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
- वेंकटेश प्रसादच्या उत्तराने पाकिस्तानी ट्रोलरची बोलती बंद
- डेव्हीड वॉर्नरच्या ‘या’ चुकामुळे झाला हैदराबादचा पराभव
- राज्यात कडक लॉकडाऊन लागणार ? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची आज महत्वाची बैठक
- आजचा सामना राजस्थानविरुद्ध पंजाब
- पांडेवर भारी नितीशचा डाव ; कोलकाताने हैदराबादला 10 धावांनी केले पराभूत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

