मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या पित्ताशयावर ब्रीच कँडी हॉस्पिटलमधील डॉ.बलसरा यांनी आज एक यशस्वी लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
शरद पवार यांना ३० मार्चला पोटात दुखत असल्याने ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांच्यावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर ७ दिवस विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यानंतर १५ दिवसानंतर त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केली जाणार होती. त्यामुळे शरद पवार यांना रविवारी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आज (सोमवारी) त्यांच्या पित्ताशयावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची तब्येत स्थिर असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले आहे.
Update
A successful Laparoscopy surgery was conducted today on our party President Sharad Pawar Saheb's Gall Bladder by Dr. Balsara.
He is in stable health and is recuperating in his room at the Breach Candy Hospital, Mumbai— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) April 12, 2021
दरम्यान, गेल्या वेळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर अनेक नेत्यांनी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली होती. तर, यशस्वी शस्त्रक्रियेनंतर त्यांनी लगेचच पुन्हा एकदा राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली होती. याबाबत, त्यांच्या कन्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या फेसबुक लाईव्हमध्ये ते रुग्णालयात वृत्तपत्र वाचत असल्याचे समोर आले होते.
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रात कोविड प्रतिबंधक नियमांचं योग्य पालन होत नाही – केंद्रीय आरोग्य पथक
- वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या व्हायरल व्हिडिओवर काही लोकांना आपत्ती; म्हणाले मुस्लिम…
- राज्यात कडक लॉकडाऊन लागणार ? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची आज महत्वाची बैठक
- …तर माझे नाव बदला, देवेंद्र फडणवीस यांचा राज्य सरकारवर जोरदार प्रहार
- मोठी बातमी : राज्य सरकार 14 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊन लावण्याच्या तयारीत…


