Share

दुरदर्शन वरील रामायणात श्रीरामांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने व्यक्त केली नाराजी

Published On: 

मुंबई : लॉक डाऊन मुळे संपूर्ण देश गेले महिनाभर बंद आहे. अनेक उद्योग, व्यवसाय व व्यापार देखील बंद आहेत. प्रत्येक राज्यातील प्रशासन व केंद्र सरकार कोरोनाच्या प्रतिबंधासाठी वारंवार सर्व नागरिकांना घरी राहण्याचे आवाहन करत आहे.

मार्च च्या शेवटच्या आठवड्यात २१ दिवसांचा लॉक डाऊन जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर लॉक डाऊन २.० म्हणजेच २१ दिवसांचा लॉक डाऊन वाढवून ३ मे पर्यंत केल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. या काळात दुरदर्शन ने लोकांना घरी राहून मनोरंजन करण्यासाठी मात्र नामी शक्कल लढवली आहे. रामायण, शक्तिमान, महाभारतासह अनेक जुन्या गाजलेल्या मालिका पुन्हा सुरु केल्या होत्या. त्यामुळे दुरदर्शन देखील सद्या TRP च्या शिखरावर पोहोचली आहे.

जसा त्याकाळी लोकांनी या मालिकांना प्रचंड प्रतिसाद दिला होता, तसाच आताही दिला आहे. विशेषतः या मालिकेत भूमिका साकारणाऱ्या प्रत्येकाचे कौतुक केले जात आहे. मात्र, रामायणामध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या अरुण गोवील यांनी आज ट्विटर वरून नाराजी व्यक्त केली आहे. अरुण गोवील यांनी रामाची भूमिका साकारली आहे.

ट्विट मध्ये ते म्हणतात, “कोणतेही राज्य सरकार असो वा केंद्र सरकार माझा आजपर्यंत कोणत्याही सरकार ने सन्मान केलेला नाही. मी उत्तर प्रदेशचा आहे, मात्र तेथील सरकार ने देखील आजपर्यंत मला सन्मानित केलेलं नाही. तसेच मी पन्नास वर्षांपासून मुंबई मध्ये आहे, मात्र महाराष्ट्र सरकार ने देखील माझा सन्मान केलेला नाही.” अशा शब्दांत त्यांनी ट्विट करून खंत व्यक्त केली असून, या ट्विट ला नेटकरी चांगलेच उचलून धरत असल्याचे दिसत आहे. त्यांनी केलेलं ट्विट-

अरुण गोवील हे ६२ वर्षीय असून त्यांनी विक्रम वेताळ, लव कुश यांसह अनेक दुरदर्शन व इतर चॅनेल वरील मालिकांमध्ये काम केलं आहे. तसेच ते अनेक भाषांमधील चित्रपटात देखील भूमिका साकारल्या आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!