Share

बीड मध्ये पुन्हा लॉकडाऊन, ‘या’ तालुक्यात असणार निर्बंध

Published On: 

बीड: शहरात कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याने पुन्हा एकदा प्रशासनाकडून कडक निर्बंध लादण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील ४ तालुक्यात हे निर्बंध असणार आहेत. जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी आष्टी, पाटोदा, शिरुर, गेवराई या तालुक्यात कडक निर्बंध लागू केले आहे. नव्याने काढण्यात आलेल्या आदेशानुसार बुधवार २८ जुलैपासून ७ ते साडे बारा पर्यंत दुकाने सुरु ठेवण्यासाठी मुभा असणार आहे. तसेच अत्यावश्यक सेवांना यातून वगळण्यात आले आहे.

लॉकडाऊन दरम्यान निर्बंध न पाळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. बीड मध्ये कोरोनाची रुग्नसंख्या वाढत असल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आल्याचे कळते. दरम्यान राज्यात पुन्हा नव्याने ६,८५७ रुग्ण आढळून आले आहेत. तर बीड व्यतिरिक्त लातूरमध्येही नव्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. तर बारामतीमध्येही आतापर्यंत२६७७४ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी २५७४३ रुग्ण बरे झाले आहेत तर ६८० जणांचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे कोरोना स्थिती अजूनही आटोक्यात आली नसल्याचे यातून दिसून येते. तर राज्यात २ कोटी नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर दुसऱ्या डोससाठी अजूनही नागरिक प्रतीक्षेत आहेत.

दरम्यान बीडमध्ये पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू झाले असून प्रशासनाकडून कोरोना रोखण्यासाठी अधिक उपाययोजना करण्यात येत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!