Share

‘या’ चैनीच्या वस्तू होणार महाग ! उत्पादन कंपन्यां किंमती वाढवण्याच्या विचारात…

Published On: 

नवी दिल्ली : लॉक डाऊन नंतर अनेक मोठ्या उद्योगांना आर्थिक फटका बसला आहे त्याच बरोबर कच्चामाल महाग झाल्यामुळे अ नेक उत्पादने महाग झाली आहेत. तर आता चैनीच्या वस्तू उत्पादन करणाऱ्या कंपन्या देखील आपल्या उत्पादनांच्या किंमती वाढवण्याच्या विचारात असल्याच्या सांगितलं जात आहे. त्यामुळे टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन किंवा मायक्रोवेव्ह ओव्हन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी मोठी संधी आहे. कारण यानंतर सर्वांच्या किंमती वाढणार आहेत. या वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यां किंमती वाढवण्याच्या विचारात आहेत.

कंपन्या लवकरच टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन किंवा मायक्रोवेव्ह ओव्हनच्या किंमती २० टक्क्यांनी वाढू शकतात. कंपन्यांना कॉपर, झिंक, स्टिल, प्लास्टिक आणि एल्यूमिनियम सारखा कच्चा माल महाग पडतोय. समुद्री मार्गाचा माल भाडे ४० ते ५० टक्क्यांनी वाढलंय.

जगभरातील तुटवड्यामुळे टीव्ही पॅनलच्या किंमती ३० ते १०० टक्क्यांनी वाढल्यायत. भारतीय बाजारपेठांवर याचा परिणाम लवकरच दिसून येईल. पुढच्या तिमाहीत या वाढलेल्या किंमतींचा परिणाम दिसेल असं कंपन्यांना वाटतंय. सणासुदीत जास्त मागणी असल्याने कंपन्यांनी ही वाढ थांबवून ठेवली होती.
सर्व उत्पादनांच्या किंमती वेगाने वाढत आहेत. फेस्टिव्ह सिझनमधील स्टॉक आता संपल्यानंतर वाढलेल्या किंमतीचा भर कंपन्या ग्राहकांवर टाकण्यासाठी तयार आहेत. या महिन्याच्या अखेरीस किंवा पुढच्या महिन्याच्या सुरुवातील किंमती वाढण्यास सुरुवात होईल असे गोदरेज अप्प्लायन्सेसचे व्यवसाय प्रमुख कमल नंदी यांनी सांगितले.

वॉशिंग मशीन आणि एसीच्या किंमती ८ ते १० टक्क्यांनी वाढतील. फ्रिजच्या किंमती १२ ते १५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. टीव्हीचे दर देखील साईजप्रमाणे ७ ते २० टक्क्यांनी वाढतील. किंमती इतक्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची ही वेळ अनेक वर्षांनी पहील्यांदा आलीय.

महत्वाच्या बातम्या 

 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!