🕒 1 min read
मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज सकाळी अटक करण्यात आली आहे. अन्वय नाईकच्या मृत्यूप्रकरणी पनवेल पोलिसांनी ही कारवाई केली असून पेशाने वास्तूविशारद असलेल्या अन्वय नाईक यांनी अलिबागजवळच्या कावीर गावात 5 मे 2018 रोजी आपलं जीवन संपवलं होतं.
आता याचप्रकरणी अर्णब गोस्वामी याला अटक करण्यात आल्यानंतर अन्वय नाईकला तब्बल अडीच वर्षानंतर तरी न्याय मिळणार का? असा सवाल निर्माण होत आहे. अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवले असून नैराश्येत आपण हे पाऊल उचलत असल्याचा आरोप अन्वय नाईक यांनी मृत्युपुर्वीच्या पत्रातून केला होता.
महाविकास आघाडी सरकारमधील नेते आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांची चिखलफेक सुरु असतानाच अन्वय नाईक यांच्या पत्नीने व मुलीने पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र पोलिसांचे आभार मानतानाच अर्णबवर गंभीर आरोप देखील केले आहेत.
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन यावर भाष्य केलं आहे. ‘गोस्वामी यांच्यावर केलेली कारवाई ही दिवंगत अन्वय नाईक यांना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने वाहिलेली श्रद्धांजली आहे. हा त्यांना व त्यांच्या परिवाराला दिलेला न्याय आहे. तर, फडणवीस सरकारने हे प्रकरण दाबले होते, असा आरोप देखील त्यांनी भाजपवर केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- शिवसेनेला कोकणातून हद्दपार करणार ; राणेंचा जोरदार प्रहार
- …म्हणून सूर्यकुमार यादवला भारतीय संघात स्थान नाही ; अखेर रवी शास्त्रींनी सोडलं मौन
- ‘आता इंडियाच मोस्ट वॉण्टेडचा पार्ट 2’ ; नवाब मलिकांनी केली अर्णब गोस्वामीवर जहरी टीका
- महाराष्ट्रातील पप्पू सरकार कोणाकोणाचा आवाज दाबणार? ; कंगणाचा घणाघात
- लोकशाहीचा आजचा काळा दिवस! गोस्वामीच्या अटकेनंतर आशिष शेलारांची बोचरी टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
