औरंगाबाद : जुन्या भांडणाच्या कारणावरुन तरुणाला लोखंडी रॉड आणि लाकडी दांड्याने मारहाण करुन जखमी केल्या प्रकरणी आरोपी शुभम भिकुलाल जाट (26, रा. जयभवानी नगर, मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन) याने सादर केलेला अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.ए. कुलकर्णी यांनी फेटाळला.
भारत उर्फ जॉन शंकर तिर्थे (28, रा. जयभवानीनगर, मुकुंदवाडी) हा 22 जानेवारी घरी जेवण करीत असतांना आरोपीने साथीदारांच्या मदतीने त्याला घरा बाहेर बोलावले. व त्याला मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन पटरी जवळ नेऊन जुन्या भांडणाच्या कारणावरुन लाकडी दांडा व लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. तिर्थे याच्या ओरडण्याच्या आवाजाने त्याची पत्नी व वहीणी धावत आल्या असता आरोपींनी तेथून पळ काढला. प्रकरणात मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्यात अटक होऊनये यासाठी आरोपीने न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला. अर्जावरील सुनावणीवेळी, गुन्ह्यात वापरलेला लाकडी दांडा आणि लोखंडी रॉड जप्त करणे आहे. गुन्ह्याचा नेमका उद्देश काय होता याचा देखील तपास बाकी आहे. तसेच आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याला जामीन दिल्यास तो पुरावे नष्ट करु शकतो त्यामुळे सहायक लोकाभियोक्ता कैलास पवार (खंडाळकर) यांनी आरोपीच्या जामीनीला विरोध केला.
महत्त्वाच्या बातम्या
- ८ दिवसांत परिस्थिती नियंत्रणात न आल्यास आणखी कडक निर्बंध लावणार – छगन भुजबळ
- राणा दाम्पत्याला विना मास्क ‘बुलेट वारी’ पडली महागात, गुन्हा दाखल
- पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराची दारं भाविकांसाठी पुन्हा बंद !
- कोरोना विषाणू घातक, काळजी घेण्याची गरज : शरद पवार
- काँग्रेसच्या जन आक्रोश रॅलीत ‘लैला मै लैला’चे लागले ठुमके
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
