नाशिक : महाराष्ट्रात कोरोना रुग्णाचे प्रमाण कमी झाल्यानंतर हळूहळू लॉकडाऊनमध्ये शिथीलता करण्यात आली. त्यामुळे कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळून राज्यात सर्व काही पूर्ववत होत होते. पण काही जण कोरोना संदर्भातील नियम पाळत नसल्यामुळे आता कोरोना रुग्णाचे प्रमाण वाढताना दिसत आहे.
सध्या कोरोनाचं संकट महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा डोकं वर काढत असताना दिसतंय. राजकीय पक्षांचे कार्यक्रम, लग्न समारंभ, सार्वजनिक ठिकाणी नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधक नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. यामुळेच महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसून येत आहे.
उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात नाईट कर्फ्यूच्या सूचना दिल्या आहेत. तर, अमरावतीमध्ये मंत्री यशोमती ठाकूर यांच्या आदेशांनुसार सोमवारी संध्याकाळी आठ वाजेपासून अमरावती शहर, अचलपूर शहर आठवड्याभरासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.
या पाठोपाठ नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी देखील नाशिकमधील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात राहावी यासाठी प्रशासनासोबत बैठक घेऊन कडक निर्बंधांचे आदेश दिले आहेत. भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन नाशिकमध्ये संचारबंदी जाहीर केल्याची माहिती दिली आहे. ‘उद्यापासून नाशिकमध्ये रात्रीची संचार बंदी लागू करण्यात आली आहे. रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत बंद संचार बंदी असेल. यात अत्यावश्यक सुविधांना सूट देण्यात आली आहे,’ अशी माहिती आढावा बैठकी नंतर दिली आहे.
यासोबतच, त्यांनी पुढे आणखी कडक निर्बंध लावावे लागतील असं सूचक विधान देखील केलं आहे. ‘८ दिवसांपर्यंत परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर आणखी कडक निर्बंध करावे लागतील. लग्न सोहळ्यांना गर्दी करू नये, नियोजन योग्य पद्धतीने करावे. केवळ १०० उपस्थितांची मर्यादा असेल. तर, मास्क न घालणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असं सांगतानाच आता मास्क न वापरल्यास 1 हजार रुपयांचा दंड केला जाईल असं देखील ते म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- रामदास आठवले घेणार बिग बी ‘अमिताभ बच्चन’ यांची भेट
- वाढत्या महागाई आणि इंधन दरवाढीविरोधात भाजपने आंदोलन करावं – संजय राऊत
- पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराची दारं भाविकांसाठी पुन्हा बंद !
- ‘उद्धवजींचे सरकार नाही रामाचे…नाही भिमाचे…नाही काही कामाचे’
- काँग्रेसच्या जन आक्रोश रॅलीत ‘लैला मै लैला’चे लागले ठुमके
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

