Share

राणा दाम्पत्याला विना मास्क ‘बुलेट वारी’ पडली महागात, गुन्हा दाखल

Published On: 

अमरावती : महाराष्ट्रात कोरोना रुग्णाचे प्रमाण कमी झाल्यानंतर हळूहळू लॉकडाऊनमध्ये शिथीलता करण्यात आली. त्यामुळे कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळून राज्यात सर्व काही पूर्ववत होत होते. पण काही जण कोरोना संदर्भातील नियम पाळत नसल्यामुळे आता कोरोना रुग्णाचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यात वाढणारी कोरोना स्थिती लक्षात घेता शिवजयंतीवर देखील निर्बंध घालण्यात आले होते. तर, विना मास्क फिरणाऱ्या सामान्यांवर दंडात्मक कारवाई केली जात असून प्रशासनातर्फे मास्क घालण्याचं आवाहन वारंवार केलं जात आहे. मात्र, लोकप्रतिनिधीच नियमांना हरताळ फासल्याचे दिसून येत आहे.

navneet rana

आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांनी शिजयंतीच्या दिवशी नियमांची पायमल्ली करत विना मास्क व विना हेल्मेट बुलेट सवारी केली होती. वाहनांद्वारे प्रवास करताना मास्क अनिवार्य असूनही खासदार व आमदारांनीच नियम मोडल्याचे समोर आले होते. याच पार्श्वभूमीवर या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. नवनीत राणा आणि रवी राणा हे बुलेटवरुन जात असताना दोघांनीही मास्क घातलेला नव्हता. याचा व्हिडीओ खुद्द रवी राणा यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंट वरून पोस्ट केला होता. जर अशाप्रकारे लोकप्रतिनिधीच स्वत: नियम मोडून सार्वजनिक ठिकाणी जात असतील तर ही बाब अत्यंत चुकीची असल्याचे म्हटले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!