औरंंगाबाद : परराज्यात आणि महाराष्ट्रातील ठाणे येथे लुटमारी आणि दरोड्याच्या गुन्ह्यात जामीनावर सुटका झाल्यानंतर साथीदारासह फरार झालेल्या आरोपीला गुन्हेशाखा पोलिसांनी सापळा रचून जाधववाडी परिसरातून गजाआड केले. सेनाऊल शेख कुदूस शेख (वय ३३, रा.झारखंड) असे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीचे नाव आहे.
ठाणे शहरातील नौपाडा पोलिस ठाण्यात लुटमारी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर १० महिने कारागृहात राहुन जामीनावर सुटका झालेला एक आरोपी जाधववाडी परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती गुन्हेशाखेला मिळाली होती.
गुन्हेशाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त रविंद्र साळोखे, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अजबसिंग जारवाल, जमादार शिवाजी झिने, राजेंद्र साळुंके, प्रभाकर राऊत, संदीप सानप यांनी सापळा रचून सेनाऊल शेख याला अटक केली. पुढील कारवाईसाठी त्याला ठाणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- अवैध वाळू उपसा; पोलिसांच्या कारवाईत ४० ब्रास वाळू जप्त
- बाप रे!! निधीच्या ‘कोको’ला शोधून दिल्यास १ लाख रुपये मिळणार
- आमीर खानने ‘रंगीला’ चित्रपटानंतर राम गोपाल वर्मा यांच्यासोबत ‘या’ कारणांमुळे केले नव्हते काम
- ‘जो कहता था गंगा ने बुलाया है, उसने माँ गंगा को रुलाया है…’
- ‘वाह रे मोदी तेरा खेल, सोने के दाम में बिकता तेल’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

