मुंबई : प्राणीप्रेम असलेली अनेक लोक त्यांच्या आवडीने घरात कुत्रे, मांजरी असे विविध प्राणी पाळतात. मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलालकराकडे कुत्रा हा प्राणी पाळला जातो. अनेकजण आपल्या प्राण्यावर खूप प्रेम करतात. ‘मुन्ना मायकल’ या चित्रपटातून नावारुपास आलेल्या निधी अग्रवालनं देखील आपल्या घरात एक कुत्रा पाळला होता. तिच्या कुत्र्याचं नाव ‘कोको’ असं आहे. मात्र तिचा लाडका कोको आता बेपत्ता झाला आहे. मात्र निधीनं कोकोला शोधून काढणाऱ्या व्यक्तीसाठी तब्बल १ लाख रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केली आहे.
निधीकडे गोल्डन रिट्रीव्हर जातीचा एक पाळीव कुत्रा आहे. त्याच्या गळ्यात गुलाबी रंगाचा पट्टा आहे. त्यावर डायमंड स्टड्स आहेत. यामुळं तो चटकन ओळखला जाऊ शकतो. तो केवळ आठ वर्षांचा आहे. शिवाय त्याला हृदयविकाराचा देखील त्रास आहे त्यामुळं निधी सध्या चिंतेत आहे.याबाबत तिनं सोशल मीडियावर एक पोस्ट देखील केली होती. या पोस्टद्वारे तिनं कोकोला शोधण्यासाठी चाहत्यांची मदत मागितली होती. पोलीसही सध्या या प्राण्याचा शोध घेत असून मात्र तो अद्याप सापडलेला नाही.

निधी अग्रवाल ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. चित्रपटांसोबतच ‘बिग बॉस’ तमिळमध्येही ती झळकली होती . ‘मिस्टर मंजु’ या तेलुगु चित्रपटातून तिने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. हा सुपरहिट चित्रपटानंतर बॉलिवूड निर्मात्याचं देखील लक्ष तिच्याकडे वळलं. २०१७ मध्ये ‘मुन्ना मायकल’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. परंतु हा चित्रपट तिकिट बारीवर फ्लॉप ठरला. त्यानंतर निधीनं पुन्हा एकदा मुन्ना मायकल आपलं लक्ष दाक्षिणात्य चित्रपटांकडे वळवलं.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘देश फक्त 6 महिन्यांसाठी पुन्हा एकदा डॉ. मनमोहन सिंगांच्या हाती द्या’
- जगनमोहन रेड्डींचा जामीन रद्द करण्याची मागणी करणाऱ्या खासदाराला अटक
- ये पब्लिक है, सब जानती है! देवेंद्र फडणवीस यांचे आता थेट सोनिया गांधींना पत्र
- ‘लसीकरण बंद करण्याबाबतचे आरोग्यमंत्र्यांचे ‘ते’ विधान म्हणजे खोटारडेपणाचा कळस’
- ‘पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी जे नियोजन करायला हवे होते ते केले नाही’


