Share

‘जो कहता था गंगा ने बुलाया है, उसने माँ गंगा को रुलाया है…’

Published On: 

नवी दिल्ली : सध्या भारतात कोरोना रुग्णांची मोठ्याप्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून अयोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. अशातच, भरमसाठ होत असलेल्या रुग्णवाढीमुळे भारतातील आरोग्य यंत्रणा कमी पडत आहे. बिहार, उत्तर प्रदेश मधून धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. गंगेच्या किनारी करोना रुग्णांचे मृतदेह वाहून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून यामुळे प्रशासन चिंतेत आहे.

दरम्यान, कॉंग्रेस नेते राहुल गांधी कोरोनाची देशातील स्थिती, लसीकरण, औषधं असा विविध मुद्द्यांवरून गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. त्यानंतर आता पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे. कोरोना रुग्णांचे मृतदेह हे गंगा नदीमध्ये वाहत असलेले आढळून आले आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. यावरून आता राहुल यांनी हल्लाबोल केला आहे.

राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अप्रत्यक्षरित्या जोरदार टीका केली आहे. राहुल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. ‘जो कहता था गंगा ने बुलाया है, उसने माँ गंगा को रुलाया है’ असं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं आहे. नरेंद्र मोदी यांनी गंगा घाटावर पूजा केली होती. त्यावेळेस त्यांनी माँ गंगेने बोलवलं असं म्हटलं होतं. यावरून आता सध्या परिस्थितीचं उदाहरण देत काँग्रेसने टोला लगावला आहे, राहुल यांनी आपल्या ट्विटमध्ये एका बातमीचा देखील फोटो शेअर केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!