Share

आमीर खानने ‘रंगीला’ चित्रपटानंतर राम गोपाल वर्मा यांच्यासोबत ‘या’ कारणांमुळे केले नव्हते काम

Published On: 

मुंबई : बॉलिवूडमधील १९ व्या काळातील अनेक चित्रपट सुपरहिट ठरले होते. असाच एक १९९५ मधील ‘रंगीला’ चित्रपट लोकप्रिय ठरला. दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होत. राम गोपाल वर्मा यांनी प्रेक्षकांसाठी अनेक सुपरहिट चित्रपट सादर केले आहेत. सध्या सोशल मीडियावर राम गोपाल वर्मा बेधडक वक्तव्यासाठी ओळखले जातात. रंगीला सुपरहिट झाल्यानंतर देखील आमीर खानने राम गोपाल वर्मा यांच्यासोबत पुढे कधीच काम केला नाही. अलीकडेच त्यांनी आमीर खानविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर ‘रंगीला’ चे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी असे काही वक्तव्य केले होते की, ते ऐकल्यानंतर आमीर खानने त्याच्याशी थेट संबंध तोडले.  राम गोपाल यांनी या सिनेमात वेटरने आमिरपेक्षा चांगली भूमीका केली असल्याचे म्हंटले होते. या वक्तव्यानंतर दोघांमध्ये एक गैरसमज निर्माण झाला. काही वर्षांनंतर राम गोपाल वर्मा यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यावेळी मोबाईल फोन नव्हते. त्यामुळे मी आमीरशी त्वरित संपर्क साधू शकलो नाही. मात्र नंतर दोघांनी एकमेकांची भेट घेतली आणि त्यांचे गैरसमज दूर केले.

राम गोपाल वर्मा म्हणाले, ‘आमीर एक अतिशय समर्पित, भावूक आणि धैर्यवान माणूस आहे. मी तसा नाही.’ ते म्हणाले की, त्यांच्यात आणि आमीरमध्ये ‘वादावादी’ नव्हती, तर ते ‘गैरसमज’ होते. आमीर खान आणि उर्मिला मातोंडकर यांच्या सुपरहिट ‘रंगीला’ चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. ‘रंगीला’मध्ये आमीर खान आणि उर्मिला मातोंडकर यांच्यासह अभिनेते जॅकी श्रॉफदेखील मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमालीची यश मिळवले होते. या सिनेमातील गाण देखील सुपरहिट झाले, आजही हा चित्रपट लोक आवडीने पाहतात.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!