Share

‘वाह रे मोदी तेरा खेल, सोने के दाम में बिकता तेल’

Published On: 

पुणे : कोरोना काळात लॉकडाऊन आणि कडक निर्बंध असताना राज्यातील जनता मेटाकुटीला आली आहे. यातच होत असलेली पेट्रोल दरवाढीचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस ने आंदोलन केले. सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस गिरीश गुरनानी यांच्या नेतृत्वाखाली कोथरूड करिष्मा चौकातील कासट पेट्रोल पंप येथे केले गेले.

‘राज्यात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे अनेक जण बेरोजगार झाले आहेत. आर्थिक आवक मंदावली असताना पेट्रोल दरवाढीचे चटके देखील सोसावे लागत आहे. राज्यातील पेट्रोल दरवाढीच्या सेन्चुरीने होरपळलेल्या जनतेकडे मोदी सरकारचे लक्ष आहे का ? सर्व सामान्य जनतेला ‘अच्छे दिन’ची स्वप्ने दाखवत आर्थिक संकटात लोटणाऱ्या सरकारचा राष्ट्रवादी युवक काँग्रेस गिरीश गुरनानी यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.

‘बहोत हो गयी महेंगाई की मार, बस्स करो मोदी सरकार’, ‘वाह रे मोदी तेरा खेल, सोने के दाम में बिकता तेल’ अशा घोषणांनी निषेध व्यक्त केला. यावेळी रवी गाडे, ऋषिकेश कडु, निलेश बच्चेवार, राजेश बच्चेवार, कृष्णा पुजारी, संकेत शिंदे, राहुल जमदाडे, प्रकाश नागरे, अमोल गायकवाड, धनंजय शेळके, संदीप बांदल आदी उपस्थित होते

महामारीच्या काळात ही दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता आहे. तसेच पेट्रोलच्या किंमती वाढल्याने भाजीपाल्यांच्या किंमतीही वाढण्याची शक्यता आहे. ही जनतेची चाललेली क्रूर चेष्टा थांबवावी म्हणून हे आंदोलन करण्यात आले , अशी माहिती गिरीश गुरनानी यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!