Share

अवैध वाळू उपसा; पोलिसांच्या कारवाईत ४० ब्रास वाळू जप्त

Published On: 

बीड: कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे तर दुसरीकडे अवैध धंदे देखील मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. एकीकडे पोलीस यंत्रणा संचारबंदीच्या ड्युटीवर आहेत तर दुसरीकडे याचाच फायदा घेत अवैध धंदे करणारे मोकाटपणे वाळू उपसा करत आहेत. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ कारवाई करत वाळू माफियांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत ४० ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे त्याच सोबत वाळू उपसा करणारे दोन पोकलेन देखील जप्त करण्यात आले.

अंबाजोगाईचे उपविभागीय अधिकारी शरद झाडगे यांच्या मार्गदर्शनात मोठा पोलिसांचा मोठा ताफा घेऊन बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास तालुक्यातील कौडगाव थडी येथे गंगेच्या पात्रात उपसा करत असलेल्या दोन पोकलेन मशीनसह ४० ब्रास वाळू जप्त केली. ‌वाळूमाफिया गोदावरी, सिंदफणा नदीपात्रातून नदीच्या काठावरील शेतकऱ्यांच्या शेतातून जेसीबी, पोकलेन घालून अवैध वाळू उपसा करत आहेत. शासनाने गव्हाणथडी आणि आडोळा या दोन ठिकाणी वाळूचे टेंडर काढले.

मात्र, कौडगाव थडी, मोगरा, सांडस चिंचोली आदी ठिकाणांहून वाळूमाफिया अवैध वाळू उपसा करत आहेत. त्यामुळे टेंडर घेणारे अडचणीत आले आहेत. कौडगाव थडी येथे अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाल्याने अंबाजोगाईचे उपविभागीय अधिकारी शरद झाडगे यांच्या मार्गदर्शनात १२ मे रोजी रात्री १ ते २ वाजेच्या सुमारास केज व माजलगावचे तहसीलदार यांनी केज, अंबाजोगाईचा पोलिस ताफा आणि माजलगावचे मंडळ अधिकारी विकास टाकणखार व इतर सहकाऱ्यांनी छापा टाकला. या वेळी अवैध वाळू उपसा करणारे दोन पोकलेन आणि ४० ब्रास वाळू जप्त केली. याप्रकरणी पोलिसांत उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!