🕒 1 min read
मुंबई : कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्याच्या उपाययोजनांबाबत कोविड राज्य कृती दलाने आज रविवार ५ सप्टेंबर रोजी ‘माझा डॉक्टर’ ऑनलाईन वैद्यकीय परिषदचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे परिषदेत सहभागी झाले असून त्यांच्या संबोधनाने परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख उपस्थित होते.
वेळी बोलताना त्यांनी राज्यातल्या करोना परिस्थितीचा आढावा घेतला आणि जनतेला मार्गदर्शनही केलं. यावेळी त्यांनी विरोधकांसह कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या स्वकीयांना देखील अप्रत्यक्षपणे सुनावलं आहे. ‘अनेकांनी राज्यात मंदिरं उघडा या मागणीसाठी आंदोलनं केली. तुम्ही आंदोलनं करा, अवश्य करा. पण करोनाविरुद्ध आंदोलन करा. आपण राजकारण करतो आणि त्यात जीव मात्र सामान्य जनतेचा जातो. हे चुकीचं आहे., असं व्हायला नको,’ असं भाष्य करत त्यांनी भाजपसह मनसेला लक्ष्य केलं.
‘काही जणांना सगळंच उघडण्याची घाई झाली आहे. पण त्या गोष्टी दीर्घकाळ बंद ठेवायला लागू नये म्हणूनच तर आम्ही ते हळूहळू, परिस्थितीचा आढावा घेऊन उघडत आहोत. आम्ही राजकारण्यांनीही कोरोना प्रतिबंधाच्या नियमांचं पालन केलं पाहिजे. जेव्हा आम्ही बाहेर जातो, जनतेत जातो, त्यावेळी आम्हीच जर नियमांचं पालन केलं नाही तर जनतेला काय सांगणार?,’ असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘करुणा शर्मा यांच्याबाबत मजकूर प्रकाशित केल्यास हायकोर्टाचा अवमान’, धनंजय मुंडेंच्या वकिलाचे माध्यमांना पत्र
- आमच्या दंडाशी बरोबरी करू नका, आमच्याकडे दंड आणि दांडा दोन्हीही असतो- संजय राऊत
- शिवसेना बैलगाडा मालकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी; संजय राऊतांनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका
- ‘राज्यपाल हे पॉलिटिकल एजंट, भाजपला हवे तेच ते करतात’, संजय राऊतांची वादग्रस्त टीका
- पंडित नेहरुंशी वैर का?; ‘राऊतांचा सामना’तून रोखठोक सवाल


