Share

आमच्या दंडाशी बरोबरी करू नका, आमच्याकडे दंड आणि दांडा दोन्हीही असतो- संजय राऊत

Published On: 

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात चांगलीच खडाजंगी सुरु आहे. राऊतांनी कोथळा काढण्याची भाषा केली होती यावर चंद्रकांत पाटलांनी त्यांना उत्तर देत राऊतांवर निशाणा साधला आहे. पाटलांच्या टीकेवर संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

मी तिथे असतो तर थोबाडीत मारली असती असं केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले म्हणून तुम्ही त्यांना अटक केली. मग संजय राऊत तर कोथळा काढण्याची भाषा करतात. हिंसाचार, सरळ धमकी देतात. यावर मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली पाहिजे. अटक केली पाहिजे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

संजय राऊतजी कोथळा काढण्यासाठी जे हातात घ्यावं लागतं ते उचलण्याची ताकद तुमच्या दंडामध्ये आहे की नाही हे बघा. आम्ही सज्जन आहोत पण एवढेही नाही की, एका गालात मारली तर दुसरा गाल पुढे करु, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी संजय राऊतांवर टीका केली. त्यांच्या याच टीकेवर राऊतांनी उत्तर दिलं आहे.

शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा काढला. तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करा म्हणता का? इतिहास समजून घ्या. आमच्या दंडाशी बरोबरी करू नका. आमच्याकडे दंड आणि दांडा दोन्ही ही असतो, असा इशारा यावेळी संजय राऊतांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!