🕒 1 min read
पुणे : बैलगाडा शैर्यतीवरुन राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यावरच आता शिवसेनेचे नेते आणि खासदार यांनी बैलगाडा शैर्यत आणि बैलगाडा मालकांविषयीची त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. ‘पुढच्या वेळी मी जेव्हा येईल तेव्हा बैलगाडा विषय मार्गी लागलेला असेल. कोर्ट काय म्हणत?, कायदा काय म्हणातो? यापेक्षा शिवसेना काय म्हणते?, हे महत्त्वाचं आहे. मेनका गांधींना इथे बोलावून बैलगाडा मालकांची ताकद काय असते?, ते एकदा दाखवून देऊ, असे सांगत शिवसेना बैलगाडा मालकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे’, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. आंबेगाव तालुक्यातील शिवसेनेच्या मेळाव्यात राऊतांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.
‘जरी मी खासदार नसलो तरी मी खासदार असताना सरकार दरबारी जेवढी ताकद होती तेवढीच आजही आहे. शिवसेना पक्ष व मुख्यमंत्री आपल्या सोबत आहेत. त्यामुळे शिवसैनिकांची कामे अडत नाही. विकासकामांसाठी सातत्याने माझे प्रयत्न सुरुच आहेत. त्यामुळे केंद्रीय वर्ग निधीतून ५ कोटी रुपये तर ग्रामीण विकास निधी व इतर योजनेतून ३ कोटी रुपयांची कामे वर्षभरात मंजूर करून आणली आहे’, अशी माहिती यावेळी संजय राऊत यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना दिली आहे.
‘एका पराभवाने खचून न जाता आपल्याला पुन्हा नव्या ताकतीने उभं राहायचं आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाला न्याय देऊन पक्ष देईल ती जबाबदारी व कामे नेटाने पार पाडावीत’, असे यावेळी राऊतांनी आवाहन केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनानंतर आता देशात नवं संकट; ‘निपाह व्हायरस’मुळे 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू
- राज्यपाल हे पॉलिटिकल एजंट, भाजपला हवे तेच ते करतात’, संजय राऊतांची वादग्रस्त टीका
- शतकी खेळीसह रोहितनं गाजवले मैदान; मोडला मैथ्यू हेडनचा मोठा विक्रम
- हरवलेली ‘ओबीसी मंत्रीमंडळ उपसमिती‘ शोधण्यासाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना करा – पडळकर
- एकनाथ खडसेंविरोधात ED चे एक हजार पानी आरोपपत्र दाखल, पत्नी आणि जावयाचाही समावेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
