शिरूर : विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या मुद्द्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगसतिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज्यपाल हे पॉलिटिक एजंट असतात. त्यांची नेमणूक ही राजकीय असते. ते तटस्थ असतात का तर अजिबात नाही, असं म्हणत राऊतांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नुकतीच राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. त्यावेळी आमदारांच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
संजय राऊत सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी खेडमध्ये बोलताना ते म्हणाले की, राज्यपाल हे पॉलिटिक एजंट असतात. त्यांची नेमणूक ही राजकीय असते. ते तटस्थ असतात का तर अजिबात नाही. राज्यपाल हे भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री होते. राज्यपाल हे केंद्रात भाजपचे मंत्री होते. राज्यपाल हे भाजपचे राज्यसभेचे सदस्य होते. राज्यपाल हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. नक्कीच त्यांच्याबद्दल आम्हाला प्रेम आणि आदर आहे. सरळमार्गी गृहस्थ आहेत. पण शेवटी ते भाजपला जे हवं आहे तेच करतील, अशा शब्दात राऊत यांनी राज्यपाल कोश्यारी यांना टोला लगावलाय.
तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर कायदेशीरपणे कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य सरकार निपक्षपाती आणि उत्तम सरकार आहे. मुख्यमंत्री उद्घव ठाकरे बेकायदेशीर काहीही करीत नाहीत, असे त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- रोहित शर्माने या वर्षी कसोटीत केल्या ‘इतक्या’ धावा; सर्व भारतीय फलंदाजांना टाकले मागे
- रोहितची शतकी खेळी, भारत ३ बाद २७०; तिसऱ्या दिवसाअखेरीस विराटसेनेकडे १७१ धावांची आघाडी
- शतकी खेळीसह रोहितनं गाजवले मैदान; मोडला मैथ्यू हेडनचा मोठा विक्रम
- हरवलेली ‘ओबीसी मंत्रीमंडळ उपसमिती‘ शोधण्यासाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना करा – पडळकर
- एकनाथ खडसेंविरोधात ED चे एक हजार पानी आरोपपत्र दाखल, पत्नी आणि जावयाचाही समावेश

