🕒 1 min read
पंढरपूर : पंढरपूरमध्ये सध्या पोटनिवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. या मतदारसंघावर विजय मिळवण्यासाठी अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचार केला. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी १७ एप्रिल रोजी मतदान होणारे. तर २ मे रोजी मतमोजणी होणार आहे. हे निकाल लागल्यानंतर राज्यातील सत्तेला नक्कीच सुरुंग लागेल, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केला.
दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभेत भाषणावेळी सत्तापालटाबाबत सूचक विधान केलं होते. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असतानाच आता भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील सरकार फार काळ टिकणार नाही असं विधान केलं आहे. ‘आठवीतलं पोरगं पण सांगेल हे सरकार फार काळ टिकणार नाही.आम्हाला ते पाडण्यात रस नाही. विरोधी पक्ष म्हणून आम्ही आमची भूमिका योग्य पद्धतीने बजावत आहोत.’ असं पाटील म्हणाले.
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात सध्या प्रचार चांगलाच तापला आहे. येथे भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात थेट लढत होत असून आरोप-प्रत्यारोपाच्या जोरदार फैरी झडत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सभांनी वातावरण ढवळून निघालं असताना आता भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील प्रचारात उतरले आहेत. पाटील यांनी आज मंगळवेढ्यात रस्त्यावर उतरून प्रचार केला.
महत्त्वाच्या बातम्या
- शालेय मोफत पाठ्यपुस्तक योजनेचा मुख्याध्यापकांनाच आर्थिक भुर्दंड!
- ‘धारावीतील १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस द्या’
- महत्त्वाचे! लॉकडाऊन काळात अत्यावश्यक वाहतुकीला पासची गरज नाही
- राज्यात आठ तर पुण्यात सहा वाजताच लॉकडाउन, प्रशासनाच्या विरोधात नाराजी
- ‘किमान आतातरी गोरगरीबांचे वीज कनेक्शन तोडू नका’


