पुणे – करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल संचारबंधीची घोषणा केली. मुख्यमंत्र्याच्या घोषणेनंतर आज महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पुणे शहरातील करोना प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी सुधारित आदेश जारी केले आहेत.
दरम्यान, अत्यावश्यक सेवा सोमवार ते शुक्रवार सकाळी ०७.०० ते सायंकाळी ०६.०० या वेळेत सुरु राहतील असे सांगण्यात आले आहे. राज्यभरात संध्याकाळी आठ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा सुरु राहणार असताना दुसऱ्या बाजूला पुण्यात मात्र सर्वकाही सहा वाजताच बंद होणार असल्याने काहीशी नाराजी दुकानदार तसेच नागरिक व्यक्त करत आहेत. पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे मान्य असले तरीही प्रशासनाचा निर्णय अजब असल्याचे दुकानदार रवी पोकळे यांनी सांगितले. पुणेकरांवर हा एकप्रकारे अन्याय केलेला आहे अशी भावना देखील त्यांनी बोलून दाखवली.
दरम्यान, सुधारित आदेशानुसार,नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय / अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास प्रतिबंध असणार आहे. अत्यावश्यक सेवा सोमवार ते शुक्रवार सकाळी ०७.०० ते सायंकाळी ०६.०० या वेळेत सुरु राहतील. घरगुती काम करणारे कामगार, वाहन चालक, स्वयंपाकी, जेष्ठ नागरिक आणि घरी आजारी असणाऱ्या लोकांना सेवा देण्यासाठी वैद्यकीय मदतनीस, नर्स यांना आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ७ ते रावी १०.०० वाजेपर्यंत प्रवास करणेस परवानगी असणार आहे.
रुग्णालये, डायग्नोस्टिक सेंटर, क्लिनिक्स, लसीकरण, वैद्यकीय विमा कार्यालय, फार्मसीज व फार्मासिटीकल कंपनी, इतर वैद्यकीय व आरोग्य सेवा, त्यास सहाय्य करणारे उत्पादन व वितरन युनिट तसेच त्यांचे डिलर्स, वाहतूक व पुरवठा करणाऱ्या आस्थापना, लस, सॅनिटायझर, मास्क, वैद्यकीय साहित्य व उपकरणे, कच्चा माल उत्पादन व पुरवठा करणारे व त्यांच्याशी निगडीत सर्व सेवा सुरु राहणार आहेत.
पशु वैद्यकीय दवाखाने, पाळीव प्राणी संगोपन केंद्र , पाळीव प्राणी खाद्याची दुकाने,भाजीपाला, फळे, डेअरी, बेकरी, मिठाई व सर्व प्रकारची खाद्यपदार्थांची दुकाने सुरु राहतील.शीतगृह आणि गोदाम सेवा,सार्वजनिक वाहतूक – टॅक्सी, रिक्षा, रेल्वे, विमान सेवा,स्थानिक प्राधिकरणाद्वारे पुरविण्यात येणाऱ्या सार्वजनिक सेवा सुरु राहतील.दूरसंचार सेवा आणि त्याच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा, मालवाहतूक, पाणी पुरवठा सेवा व त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा इत्यादी सुरु राहतील.
ई – कॉमर्स,मान्यता प्राप्त मिडिया,पेट्रोल पंप आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने पुरविणान्या सेवा,सर्व प्रकारच्या कार्गो / कुरियर सेवा,डेटा सेंटर । क्लाऊड सर्विस प्रोव्हायडर / माहिती व तंत्रज्ञान यांचेशी संबंधित,पायाभूत सुविधा आणि सेवा शासकीय व खाजगी सुरक्षा सेवा,विद्युत व गॅस वितरण सेवा,एटीएम,सर्व प्रकारचे आयात-निर्यात कृषी संबंधित सेवा आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना सुरु राहतील.
सिनेमागृहं, नाट्यगृहं आणि सभागृहं बंद राहतील. अम्यूजमेंट पार्क, आर्केड, व्हीडिओ गेम पार्लर बंद राहतील. वॉटर पार्क , क्लब, स्विमिंग पूल, जिम, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स देखील बंद असणार आहेत.दुकानं, मॉल, शॉपिंग सेंटर्स जे अत्यावश्यक सुविधांमध्ये मोडत नाहीत ते बंद राहतील. धार्मिक केंद्र बंद असतील. सलून, स्पा, ब्युटी पार्लर बंद असतील.सर्व प्रकारचे खाजगी क्लासेस बंद राहतील.कोणत्याही स्वरुपाचे धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रम आयोजित करण्यास परवानगी नाही.लग्नाला केवळ 25 जणांच्या उपस्थितीला परवानगी आहे. अंत्यविधीला केवळ 20 जणांना उपस्थित राहण्यास परवानगी आहे.
महत्वाच्या बातम्या
- बेन स्टोक्स स्पर्धेतून बाहेर, ‘या’ चार खेळाडूंपैकी एकाची लागू शकते संघात वर्णी
- आखेरच्या चार षटकात बदलले सामन्याचे चित्र; मुंबईच्या गोलंदाजानी लढवली खिंड
- पहिल्या विजयानंतर मुंबई इंडियन्सची गुणतालीकेत भरारी; केकेआरची झाली घसरण
- सभा होणारच! गोळ्या चालवल्या तरी हरकत नाही…संजय राऊत कर्नाटक प्रशासनाला भिडले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

