Share

तो काळ भयंकर होता; उद्धव ठाकरेंच्या संबोधनाला सुरुवात !

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णाचे प्रमाण कमी झाल्यानंतर हळूहळू लॉकडाऊनमध्ये शिथीलता करण्यात आली. त्यामुळे कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळून राज्यात सर्व काही पूर्ववत होत होते. पण काही जण कोरोना संदर्भातील नियम पाळत नसल्यामुळे आता कोरोना रुग्णाचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

कोरोनाचं संकट महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा डोकं वर काढत असताना दिसतंय. राजकीय पक्षांचे कार्यक्रम, लग्न समारंभ, सार्वजनिक ठिकाणी नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधक नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. यामुळेच महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसून येत आहे. यामुळेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आता महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधत आहेत.

पुणे, अमरावती, यवतमाळ, नाशिक अशा जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध लागू केले जात असताना राज्याबाबत उद्धव ठाकरे काही महत्वाचा निर्णय घेणार का ? याकडे सामान्यांचं लक्ष्य लागलं आहे. संवाद सुरु करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन मधील आठवण सांगितली आहे. ‘घरात डांबून ठेवणं हे कोणालाच आवडत नाही. मला देखील आवडत नाही. लॉकडाऊनचा काळ हा भयंकर होता. कोरोना पुन्हा एकदा डोकं काढत आहे,’ असं भाष्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात नाईट कर्फ्यूच्या सूचना दिल्या आहेत. तर, अमरावतीमध्ये मंत्री यशोमती ठाकूर यांच्या आदेशांनुसार सोमवारी संध्याकाळी आठ वाजेपासून अमरावती शहर, अचलपूर शहर आठवड्याभरासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या पाठोपाठ नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी देखील रात्रीची संचार बंदी लागू केली आहे. रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत बंद संचार बंदी असेल.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!