Share

‘राष्ट्रवादी म्हणजे खानावळ नाही, भाजपमधून परत आलेल्यांना चटके सोसू द्या’

Published On: 

ठाणे : २०१४ मध्ये भाजपने केंद्रासह महाराष्ट्रात देखील सत्ता स्थापन केली होती. यानंतर, भाजपमध्ये जोरदार इनकमिंग झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेससह काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, २०१९ मध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळून देखील शिवसेनेनं साथ सोडल्यामुळे विरोधी पक्षात बसावं लागलं आहे. तर, शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाऊन महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं.

सत्ता आल्यानंतर भाजपवासी झालेले अनेक नाराज नेते व आमदार घरवापसी करण्यासाठी उत्सुक असल्याचे वारंवार महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांकडून सांगितले जात आहे. एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिट्ठी देत राष्ट्रवादीची वाट धरली. तर, येत्या काळात अनेक आमदार व नेते परत येतील असे संकेत मंत्री जयंत पाटील, मंत्री नवाब मलिकांसह काँग्रेसच्या नेत्यांनी दिले आहेत.

यावर आज गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील भाष्य केलं आहे. 2014 साली राज्यात सत्तांतर झाल्यानंतर अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी सोडून भाजपात गेले, ते आता राष्ट्रवादीत पुन्हा येण्यासाठी धडपड करतायत. काहींनी प्रवेशही केलाय. मात्र जे कार्यकर्ते कठीण काळात पक्षासोबत खंबीरपणे उभे होते, त्यांनाच पक्ष पहिलं प्राधान्य देईल, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यक्रमात बोलत होते.

‘त्यांना’ २ वर्षे वेटिंगवर ठेवा !

कार्यकर्त्यांना पक्षात घ्या, पण त्यांना किमान दोन वर्ष कुठलंही पद देऊ नका. सत्तेच्या सावलीसाठी जे तिकडे गेले त्यांना आता परत सत्तेच्या सावलीत याचचं असेल, तर आधी चटके सोसू द्या. कारण राष्ट्रवादी काँग्रेस ही काही खानावळ नाहीये, असे खडे बोल देखील जितेंद्र आव्हाड यांनी सुनावले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!