औरंगाबाद : ऑटोपार्ट कंपनीतील कामगाराच्या खिशात सापडलेल्या गांजाची तक्रार दिल्यावरुन मजूर ठेकेदाराला बोलावून धमकी देत दीड लाखांच्या लाचेची मागणी करुन ६० हजार रुपये स्विकारणाऱ्या जमादार गणेश ज्ञानेश्वर अंतरप (वय ४४) यांना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जे. रामगडीया यांनी बुधवारी (दि.२) दिले.
प्रकरणात तक्रारदाराने दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादीचा एमआयडीसी वाळुजमध्ये येथील कंपन्यांमध्ये कामगार पुरवण्याचा व्यवसाय आहे. एमाआयडीसी वाळूज येथील एका ऑटोपार्ट बनविणारी कंपनीत फिर्यादीचे १४० कामगार लेबर म्हणून काम करतात. २८ मे रोजी कंपनीत नव्याने रुजू झालेल्या एका कामगाराच्या खिशात आठवडाभरापुर्वी तंबाखूच्या पुडीत गांजा आढळल्याची तक्रार कंपनीने एमआयडीसी वाळुज पोलीस ठाण्यात केली होती. कंपनीच्या या तक्रारी अर्जाची चौकशी उपनिरीक्षक पंडित व जमादार अंतरपकडे वरिष्ठांकडून देण्यात आली होती.
३० मे रोजी अंतरपने कामगाराच्या कंत्राटदाराला फोन करुन ठाण्यात बोलावून घेतले. त्यावेळी ठेकेदाराला तुझ्यावर गांजा पुरवल्याचा गंभीर आरोप असल्याचे सांगून कारवाई न करण्यासाठी दीड लाख रुपयांची मागणी करण्यात आली. मात्र, ठेकेदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांच्याकडे तक्रार केली. त्यानुसार, लाचलुचपत प्रतिबंक विभागाने सापळा रचून अंतरपला ६० हजार रुपये स्विकारताना रंगेहाथ पकडले. प्रकरणात एमआडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सरकारने शरियत कायद्यामध्ये हस्तक्षेप केल्याने करोना आणि चक्रीवादळांसारख्या आपत्ती आल्या’
- राज्याच्या जीएसटी वसुलीत मोठी घट, लॉकडाऊनच्या निर्बंधांचा अर्थव्यवस्थेला फटका
- दीपिका सिंह नव्या डान्स व्हिडीओमुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर झाली ट्रोल…
- अंकिता लोखंडेचा चाहत्यांना ‘गुड बाय’ ; पोस्ट शेअर करत दिली माहिती
- ‘लसीकरणाबाबत केंद्राची पॉलिसी स्पष्ट नाही; रोज नवीन नियमांची होतेय घोषणा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

