मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे देश सोडून गेल्याच्या बातम्यांना ऊत आला आहे. असं असताना आता त्यांच्या विरोधात ठाणे पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. या बातमीची खात्री खुद्द राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी स्वत: केली आहे. परमबीर सिंह आपल्या घरी दिसून आले नाहीत. तसंच केंद्र आणि राज्यांच्या तपास यंत्रणांकडून अनेक समन्स बजावूनही ते चौकशीसाठी हजर झाले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरोधात आता ठाणे पोलिसांनी लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.
अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून तपास सुरु आहे. या प्रकरणात एनआयएकडून परमबीर सिंग यांना अनेकदा समन्स बजावण्यात आलं आहे. पण आतापर्यंत एकही समन्स परमबीर सिंग यांना पोहोचले नाही. त्यामुळे अटकेच्या भीतीने परमबीर सिंग परदेशात गेल्याची चर्चा सध्या सुरु आहे.
आता ठाणे पोलिसांनी परमबीर सिंग यांच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. त्यामुळे सिंग हे आता विमानतळावरुन देशाबाहेर जाऊ शकत नाहीत. दुसरीकडे सिंग यांचा रजेचा कालावधीही संपला आहे. पण रजेचा कालावधी वाढवण्यासाठीही त्यांनी अर्ज केलेला नाही. त्यामुळे परमबीर सिंग हे कुठे आहेत? असा सवाल आता विचारला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याविरोधात आनंदराव अडसुळ यांची हायकोर्टात धाव
- धक्कादायक! नॅशनल बॅडमिंटनपटूचा राहत्या घराच्या छतावर संशयास्पद मृत्यू
- वराती मागून घोडे नाचवून काहीच उपयोग नाही; दरेकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- वारी मार्गाचे प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावणार- अजित पवार
- नवऱ्याने मारहान करणे याला कौटुंबिक हिंसाचार म्हणतात हेच महिलांना माहित नाही; चित्रा वाघ

