अलिबाग: भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आज कोर्लईत पोहोचले. यावेळी भाजपचे (BJP) कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते. बाईकवर बसून शेकडो कार्यकर्ते सोमय्यांसोबत आले होते. यावेळी कोर्लईत तनावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.
सोमय्या यांच्यासोबत भाजपचे कार्यकर्ते असल्याने शिवसैनिकांनीही (ShivSainik) कोर्लईच्या ग्रामपंचायतीसमोर तुफान गर्दी केली. यात महिला रणरागिणीचा सर्वाधिक समावेश होता. शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आल्याने कोर्लईत प्रचंड तणाव निर्माण झाला होता.
यावेळी सोमय्या यांचा ताफाही अडवण्याचा प्रयत्न झाला. तसेच सोमय्या हे ग्रामपंचायतीच्या कार्यालयात जाताच शिवसैनिकांनीही कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. तसेच सोमय्या पंचायत कार्यालयातून गेल्यानंतर शिवसैनिकांनी सोमय्या आले त्या जागेवर गोमूत्र आणि दूध शिंपडून शुद्धीकरण केलं.
महत्वाच्या बातम्या:
“मनमोहन सिंग यांना भारताला सर्वात कमकुवत…”, ‘त्या’ वक्तव्यावर निर्मला सीतारामन यांची प्रतिक्रिया
औरंगाबाद शहराला होणारा पाणीपुरवठा बंद करणार; जायकवाडी पाटबंधारे विभागाची माहिती
पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत बिघाडी?
बाबर आझम सोबतच्या वादाबद्दल वसीम अक्रमने केला खुलासा म्हणाला…
“असं वाटतंय विरोधक दररोज रात्री कॉन्फरन्स कॉलवर चर्चा करतात”, केजरीवालांचे टीकास्त्र


