मुंबई: गेल्या काही वर्षांत, मोहम्मद सिराज हा भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज म्हणून उदयास आला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यानंतर सिराजने त्याचे संघातील स्थान बळकट केले आहे. त्याने टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर सलग दुसरी कसोटी मालिका जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. या सगळ्यात भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा सिराजच्या कारकिर्दीत मोठा वाटा आहे. आणि त्यांची मैत्रीही यामुळे चर्चेत येत असते.
नुकतेच सिराजने आरसीबी पॉडकास्टवर बोलताना, सिराजने त्याच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाला बिर्याणीच्या मेजवानीसाठी त्याच्या घरी आमंत्रित केले होते तेव्हाची एक घटना आठवली. “मी आरसीबीमधील सगळ्यांना माझ्या घरी जेवायला बोलावलं होतं. हॉटेलमधून थेट घरी आलो. जेव्हा मी विराटला बोलावले तेव्हा तो म्हणाला, “माझी पाठ दुखत आहे, मी येऊ शकत नाही.” मी त्याला आराम करायला सांगितले. अजून काय सांगू. पण, सगळे आले तेव्हा मी त्याला गाडीतून उतरताना पाहिले. सर्वजण तिथे होते, पीपी (पार्थिव पटेल) भाई, चहल भाई. मी धावतच विराट भैय्याकडे गेलो आणि त्याला मिठी मारली. तो माझ्या आयुष्यातील सर्वात भारी सरप्राईस होता. कारण विराट भैय्या म्हणाला होता की तो येणार नाही. विराट कोहली टोळी चौकीत आला आहे याची मोठी बातमी झाली होती.”
सिराजने विराटच्या कर्णधारपदात सर्वोत्तम कामगिरी केली आहे. हेच कारण असावे कि त्याला आरसीबीने मेगा ऑक्शनमध्ये रिटेन केले होते. सिराज सोबत ग्लेन मॅक्सवेल आणि माजी कर्णधार विराट कोहली यांना रिटेन करण्यात आले आहे. सिराजने त्याला आयपीलने प्रसिद्धी दिली आणि त्याला ‘सामाजिक वर्तुळात राहण्याचे मार्ग’ शिकवले असेही यावेळी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- “मुख्यमंत्री ठाकरेंनी खुर्ची वाचवण्यासाठी पत्नीशी गद्दारी केली?”, सोमय्यांचा सवाल
- किरीट सोमय्या कोर्लईत येताच तणाव, शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने
- “….पुरावे असतात तेव्हा वाझे आणि अनिल देशमुख होतो”, भातखळकरांचा संजय राऊतांना टोला
- राष्ट्रवादी काँग्रेस हा पश्चिम महाराष्ट्रापुरता पक्ष; गिरीश बापटांची खोचक टीका
- IPL 2022: चेन्नई सुपर किंग्समध्ये गेलेल्या मराठमोळ्या अंडर १९ स्टारवर खरे वय लपवल्याचा आरोप!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

