Share

राष्ट्रवादी काँग्रेस हा पश्चिम महाराष्ट्रापुरता पक्ष; गिरीश बापटांची खोचक टीका

Published On: 

पुणे : सध्या देशभरात निवडणुकांचा प्रचार जोरदार चालू आहे. तर महाराष्ट्रात सुद्धा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. महाराष्ट्र्रात पुणे- मुंबई सह १० महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. पुणे शहरात सुद्धा राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

आजच पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने पुणे शहराचे खासदार गिरीश बापट यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले. नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांमुळे देशभरात कोरोना पसरला अशी टीका केली होती ;याच्याच पार्श्वभूमीवर आज पुणे शहर काँग्रेसच्या वतीने गिरीश बापट यांच्या घरासमोर  ” नरेंद्र मोदी माफी मांगो” आंदोलन करण्यात आले. या काँग्रेसने केलेल्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना गिरीश बापट म्हणाले कि, ” ज्या ज्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी माझ्या घरासमोर आंदोलन केले ते सर्व माझेच कार्यकर्ते होते. काँग्रेस पक्षाच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देतानाच गिरीश बापट यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पण डिवचले आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस हा पश्चिम महाराष्ट्रापुरताच मर्यादित पक्ष आहे, अशा शब्दात बापट यांनी टीका केली आहे. तसेच मी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांना १६ मार्चला भेटणार आहे असेही आज गिरीश बापट म्हणाले. मध्यंतरी प्रशांत जगताप यांनी पुणे मनपाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे एकूण १६ नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे असे म्हंटले होते यावर गिरीश बापट यांनी आपण प्रशांत जगताप यांना १६ मार्चला भेटणार आहोत अशी आज प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी पक्ष हा पश्चिम महाराष्ट्रापुरताच मर्यादित पक्ष आहे अशी टीका आज गिरीश बापट यांनी केली आहे.

राष्ट्रवादी पक्षात जेमतेम चार पाच जणच महत्वाचे निर्णय घेत असतात त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष हा परिवारवादी पक्ष आहे अशी पण टीका आज गिरीश बापट यांनी केली आहे. तसेच आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष स्वबळावर सत्तेवर येईल असा आत्मविश्वास बोलून दाखवला.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!