Share

पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’च्या वेळी थाळीनाद करा, शेतकऱ्यांचे आवाहन

Published On: 

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या जाचक नवीन कृषी कायद्यांविरोधात अजूनही शेतकर्‍यांचे आंदोलन सुरूच आहे. शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी तळ ठोकून आहेत. कृषी कायदे मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहिल, असं शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, सोमवारी २४ तासांचं उपोषण करणार असल्याचा शेतकऱ्यांनी जाहीर केलं आहे. यासह २५ ते २७ डिसेंबरदरम्यान हरयाणातील महामार्गांवरील टोलवसुली करू देणार नाही. तसंच २३ डिसेंबरला म्हणजे येत्या बुधवारी शेतकरी दिवस आहे. या दिवशी देशातील जनतेने एक दिवसाचं उपोषण करावं, असं आवाहन शेतकरी संघटनेचे नेते राकेश टिकैत यांनी केलं आहे.

दरम्यान, येत्या २७ तारखेला पंतप्रधान मोदी ‘मन की बात’मधून संवाद साधणार आहेत. यावेळी सर्व शेतकरी थाळीनाद करून आपला निषेध नोंदवतील, असं आवाहन जगजितसिंग ढल्लेवाला यांनी केले आहे. पंतप्रधान मोदींचे संबोधन संपेपर्यंत थाळीनाद सुरू ठेवावा, असं ते म्हणाले. मोदींची मन की बात आम्हाला ऐकायची नाही असे शेतकऱ्यांनी ठरवलं आहे.

दुसरीकडे शेतकऱ्यांच्या या आंदोलनात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सहभागी व्हावं, अशी मागणी आता करण्यात येत आहे. त्यासाठी दिल्लीतील 6 शेतकऱ्यांचं एक शिष्टमंडळ अण्णांच्या भेटीसाठी काल राळेगणसिद्धीत दाखल झाले होते. ह्या शिष्टमंडळाने अण्णा हजारे यांच्यासोबत चर्चा करुन त्यांना आंदोलनात सहभागी होण्याची विनंती केली.

मात्र, दिल्लीतील कडाक्याची थंडी, आपले वय, सुरक्षा आणि कोरोनाची स्थिती लक्षात घेता हे शक्य होणार नसल्याचे सांगत हजारे यांनी त्यांची समजूत काढली. मात्र, आपल्या जुन्या मागण्यांसाठी दिल्लीत आंदोलन करण्याची परवानगी हजारे यांनी सरकारकडे मागितली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!