Share

शिवसेनेला धक्का देत ‘हा’ माजी आमदार करणार आज भाजपमध्ये प्रवेश

Published On: 

नाशिक : अनेक महिन्यांपासून राजकीय विजनवासात राहिलेले माजी आमदार बाळासाहेब सानप यांचा भाजपचा पुनर्प्रवेशाचा मुहूर्त निश्चित झाला आहे. सोमवारी सकाळी 12 वाजता मुंबईतील प्रदेश कार्यालयात त्यांना प्रवेश दिला जाणार आहे. बाळासाहेब सानप यांच्या भाजप प्रवेशामुळे समर्थक नगरसेवक व कार्यकर्त्यांमध्ये आनंदोत्सव सुरू आहे.

मध्यंतरीच्या काळात बाळासाहेब सानप यांच्या मातोश्रींचे निधन झाल्याने त्याचे निमित्त साधून गिरीष महाजन यांनी भेट घेत पुर्नप्रवेशाचे बीज रोवले होते. जळगावातील बीएचआर घोटाळ्यासंदर्भात महाजन अडचणीत आल्याने प्रवेश लांबला. शिवसेनेने देखील सानप यांच्या सारखा मोहरा हातून जावू नये म्हणून मातोश्रीवर बोलावून घेताना मोठी जबाबदारी देण्याचे आश्वासन दिले होते. परंतू दोन दिवसातचं सानप यांच्या पुर्नप्रवेशावर विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी शिक्कामोर्तब केले. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय यांनी मध्यस्ती करताना सोमवारी प्रवेशाचा मुहूर्त निश्चित केला. मुहूर्ताची निश्चिती झाल्यानंतर सानप यांनी तातडीने समर्थकांना निरोप देत मुंबईत शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी केली आहे.

सानप यांनी दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांना पक्षात संघटनात्मक जबाबदारी देण्याबरोबरच महामंडळाचे आश्वासन देण्यात आल्याचं बोललं जात आहे. मात्र, या आश्वासनावर सानप अजूनही समाधानी नसल्याचं सांगण्यात येत आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर सानप अडगळीत गेले होते. आता पालिका निवडणुका आल्याने आपल्याला महत्त्व दिलं जात असून निवडणुका गेल्यावर पुन्हा जैसे थे परिस्थितीला सामोरे जावं लागणार असल्याचं सानप ओळखून आहेत. त्यामुळेच सानप यांनी शिवबंधन सोडून भाजपचा झेंडा हाती घेणार आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!