मुंबई:- मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला अद्याप सव्वा वर्षाचा अवधी आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे नियोजन भाजपाने सुरू केल्याचे वृत्त आल्यापासून या निवडणुकीचा विषय राजकीय वर्तुळात ऐरणीवर आला आहे. आता, भाजप पाठोपाठ काँग्रेसने देखील आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी नुकतीच अनुभवी नेते व विधान परिषद सदस्य भाई जगताप यांची वर्णी लागली आहे. आगामी मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून जगताप यांच्यापुढे मुंबईत पक्ष संघटना मजबूत करण्याचे मोठे आवाहन असणार आहे.
दरम्यान, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्र हातात आल्यानंतर आमदार भाई जगताप यांनी पहिल्याच दिवशी स्वबळाचा नारा दिला आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसने २२७ जागा स्वबळावर लढवाव्यात असं कॅप्टन म्हणून माझं मत असल्याचं भाई जगताप म्हणाले आहे.
राज्यात आम्ही सत्तेत एकत्र आहोत त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत एकत्र लढलो तर हरकत काय, असं मत मुंबई काँग्रेसचे मावळते अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी व्यक्त केले आहे. तसेच महाविकास आघाडीने आम्हाला योग्य तो सन्मान द्यावा अशी मागणीही एकनाथ गायकवाड यांनी केली आहे.
दरम्यान, युतीबाबत आमचा कोणताही निर्णय अजून झालेला नाही. सद्याची युती ही फक्त महाराष्ट्रातील सरकार चालवण्यासाठीची आहे. यासाठी कॉमन मिनिमम प्रोग्रॅमचा आधार घेण्यात आला आहे. काँग्रेसचे अनेक नेते, पदाधिकारी सगळ्यांचं म्हणणं आहे की काँग्रेस स्वबळावर लढली पाहिजे. आमची स्वबळावर लढण्याची तयारी सुरु आहे, असं मत काँग्रेस नेते नसीम खान यांनी व्यक्त केले आहे.
भाई जगताप यांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर आता मित्रपक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) गटाचे सर्वेसर्वा सचिन खरात यांनी ‘महाराष्ट्र देशा’ला याबाबत महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई हे जगातील आर्थिक महत्वाचे केंद्र आहे तसेच मुंबई भारताची आर्थिक राजधानी आहे. मुंबई मधील अनेक महत्वाची कार्यालये भाजपा गुजरात व अन्य राज्यात जाणूनबुजून नेण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या खीळखिळा करण्याचा केंद्रातील भाजपाचा प्रयत्न आहे. त्यामुळे हा धोका टाळण्यासाठी महाविकासआघाडीतील सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येऊन मुंबई महानगरपालिकेची निवडणूक एकत्रितपणे लढवावी.मुंबई महानगरपालिका भाजपच्या घश्यात जाऊ देऊ नये असे महाविकासआघाडीचा घटक पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मित्र पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षास वाटते असे त्यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- यासाठी मी आमदार निलेश लंकेंचा प्रचारक म्हणून काम करणार- अण्णा हजारे
- पंतप्रधान मोदींनी कडेकोट बंदोबस्ताशिवाय गुरुद्वारामध्ये दिली अचानक भेट
- … म्हणून भाई जगताप यांची निवड कॉंग्रेसचा मास्टरस्ट्रोक ठरण्याची शक्यता
- दुखापतग्रस्थ मोहम्मद शमीच्या जागी लागणार ‘या’ युवा खेळाडूची वर्णी
- शिवसेनेला धक्का देत ‘हा’ माजी आमदार करणार आज भाजपमध्ये प्रवेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

