ऑस्ट्रेलिया : नुकत्याच पार पडलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील पहिल्या कसोटी सामन्यात अवघ्या 15 धावात भारताचा अर्धा संघ तंबूत धाडला, शिवाय अवघ्या ३६ धावांवर संपूर्ण संघ तंबूत परतला. ऑस्ट्रेलियाने भारताचा आठ गडी राखून पराभव केला. सामन्यातील पहिले दोन दिवस आघाडीवर असणाऱ्या भारतीय संघासाठी हा पराभव लाजिरवाणा आहे भारताचा हा पराभव न विसरण्यासारखा आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंनी निराशाजनक कामगिरी केली. यामुळे दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियामध्ये काही बदल करण्याची तयारी भारतीय संघ व्यवस्थापननाने केली आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून खेळण्यात येणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियामध्ये एकूण 4 बदल करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
1. कर्णधार विराट कोहलीची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा गर्भवती आहे. लवकरच अनुष्का-विराट आई-बाबा होणार आहेत. त्यामुळे पहिल्या सामन्यानंतर विराट मायदेशी परतणार आहे. याच कारणामुळे विराटच्या जागी केएल राहुलला संधी मिळू शकते.
2. दुसऱ्या डावात बॅटिंगदरम्यान मोहम्मद शमीच्या उजव्या हाताच्या मनगटाला दुखापत झाली. त्यामुळे शमी मालिकेतून बाहेर झाला आहे. यामुळे संघात शमीच्या जागेवर मोहम्मद सिराजला पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.
3. पृथ्वी शॉ आयपीएलच्या 13 व्या मोसमापासून ढिसाळ कामगिरी करतोय. तरीही त्याची कसोटी मालिकेसाठी निवड करण्यात आली. त्याला पहिल्या कसोटीत प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली. मात्र पृथ्वीने पुन्हा टीम मॅनेजमेंटचा विश्वास खोटा ठरवला. पृथ्वीने पहिल्या डावात शून्य तर दुसऱ्या डावात अवघ्या 4 धावा केल्या. यामुळे पृथ्वीच्या जागी दुसऱ्या सामन्यासाठी युवा शुभमन गिलला सलामीवीर म्हणून संधी मिळण्याची तीव्र शक्यता आहे. जर शुभमनला संधी मिळाली, तर त्याचं हे कसोटी पदार्पण ठरेल.
4. पहिल्या सामन्यात अजिंक्य रहाणे आणि विराटचा अपवाद वगळता इतर कोणत्याही बॅट्समनला चांगली खेळी करता आली नाही. कांगारुंनी भारतीय फलंदाजांना मैदानात सेट होण्याची वेळ दिली नाही. कसोटी मालिकेआधी ‘ऑस्ट्रेलिया अ’ विरोधात 2 सराव सामने खेळण्यात आले. या दुसऱ्या सामन्यात पंतने शानदार शतकी खेळी केली. त्यामुळे पंतला विकेटकीपर रिद्धीमान साहाच्या जागी संधी मिळू शकते. तसेच ऑलराऊंडर म्हणून रवींद्र जाडेजाला हनुमा विहारीच्या जागी संधी दिली जाऊ शकते. दरम्यान जाडेजाच्या प्रकृतीबाबत टीम मॅनेजमेंटकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. टीम मधील या बदलांनंतर टीम इंडियाची खेळी पाहण्याजोगी ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- …अन् गृहमंत्र्यांनी केले दिव्यांग लेकीचे कन्यादान !
- मुंबई मेट्रोची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करा – उद्धव ठाकरे
- जिल्हा वासियांचे स्वप्न असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे काम युद्ध पातळीवर सुरू – सामंत
- मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या आड कुणालाही येऊ देणार नाही – उद्धव ठाकरे
- किसान एकता मंचचं पेज तीन तासांनी पुन्हा ‘अनब्लॉक’ केल्यानंतर फेसबुककडून खुलासा !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

