Share

ठाकरेंचा कोरडा प्रवास उपयोगाचा नाही, थेट निर्णय घेऊन मदत करा : चंद्रकांत पाटील

Published On: 

पुणे : परतीच्या पावसामुळे महाराष्ट्रात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात देखील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. तर अनेकांचा संसार देखील आता उघड्यावर पडला असून सगळं वाहून गेल्याने खाणार काय? असा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. गेल्या २ दिवसांत अनेक नेत्यांनी दौऱ्यांचा धडाका लावला आहे.

विरोधकांच्या टीकेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. या दौऱ्यामध्ये ‘हे शेतकऱ्यांचं सरकार असून शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीर आहोत, जीवाचं काही बरं-वाईट करू नका’ असं भाष्य करत ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

मात्र, शेतकऱ्यांचा रोष वाढला असून मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष बांधावर शेतीचं झालेलं नुकसान बघावं आणि लवकरात लवकर नुकसान भरपाईची तरतूद करावी अशी उद्विग्न मागणी केली गेली. उद्धव ठाकरेंनी सांगवी, अक्कलकोट येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. तेलंगणाने मदत जाहीर केली असून महाराष्ट्रात कधी? असा प्रश्न केला जात आहे.

पंचनामे न करता सरसकट मदत जाहीर करावी अशी मागणी विरोधी पक्षांनी केली. मात्र, पंचनामे सुरु असून कोणालाही वाऱ्यावर सोडणार नसल्याचं वक्तव्य काल सोलापूर दौऱ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. सद्या कोणतीही ठोस घोषणा राज्य सरकारकडून केली नसल्याने भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे.

‘भाजपच्या टिकेमुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर निघाले’ अशी प्रतिक्रिया त्यांनी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर दिली होती. आता, ‘मुख्यमंत्र्यांनी धावता प्रवास करून उपयोग नाही. त्यांनी कोरडा प्रवास करू नये. ते मुख्यमंत्री आहेत. थेट निर्णय घेऊ शकतात. शेतकऱ्यांना थेट मदत देऊ शकतात,’ असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!