Share

राज्यात २० हजार सभा घेऊन ठाकरे सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणणार : चंद्रकांत पाटील

Published On: 

मुंबई : महाआघाडी सरकारच्या काळात झालेल्या राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविरोधात राज्यात २० हजार छोट्या सभा घेणार असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. या सभांद्वारे व्यापक जनजागृती करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. तसेच या सभांमध्ये कोरोना संसर्गाचा धोका होऊ नये म्हणून सर्व निर्बंध पाळून अभियान राबवण्यात येईल, असंही त्यांनी नमूद केलं. ते भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

भाजपाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची शनिवारी बैठक आयोजित करण्यात आली, या बैठकीला भाजपा नेत्यांनी मार्गदर्शन केले, त्यानंतर पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात गुन्हेगारांना बिनदिक्कत संरक्षण दिले जात आहे.

तरुणींवर अत्याचार , तरुणींचे संशयास्पद मृत्यू या सारख्या गुन्ह्यांमध्ये राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांची नावे थेटपणे घेतली जात आहेत. या मंत्र्यांना सरकारकडून संरक्षण दिले जात आहे. पूजा चव्हाण या तरुणीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी भाजपाने आंदोलन केल्यावरच संबंधित मंत्र्यांचा राजीनामा घेतला गेला. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूबाबतही राज्य सरकारची भूमिका संशयास्पद आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेप्रमाणे राजकारण समाजकारणाचं माध्यम आहे. कायदे करण्याचं माध्यम आहे. पण इथे या, गुन्हे करा आणि राजकीय नेते असल्याने तुम्ही अशा प्रकरणातून बाहेर पडू शकता. तुमचं कुणी काहीही वाकडं करू शकत नाही, असं सगळं सध्या राज्यात सुरू आहे. राज्यात हम करे सो कायदा सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!