मुंबई : १ मार्च पासून महाराष्ट्राचे अर्थसंकल्प अधिवेशन सुरु झाले आहे. अधिवेशन सुरु झाल्यापासून म्हणजेच अधिवेशनाच्या पहिल्या दिवसांपासून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी अनेक प्रकारच्या टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर केल्या होत्या.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरे सरकार विरुद्ध भाजप असा जोरदार सामना रंगला. भाजपने विविध मुद्द्यांवर सरकारवर गंभीर आरोप केले. या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भाषा वापरली. मात्र याच भाषणावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीची माहिती देताना आक्षेपार्ह शब्द वापरला आणि भाजप नेते चांगलेच भडकले.
‘तुम्हाला बाळासाहेबांच्या आठवणीने उमाळे येत आहेत. मात्र याच बाळासाहेबांच्या खोलीत ज्या खोलीला आम्ही मंदिर समजतो, तिथं बंद दरवाजाआड मी आणि अमित शहा यांनी पुढच्या वाटचालीची चर्चा केली, मात्र नंतर निर्लज्जपणे…होय हा शब्द असंसदीय असला तरीही मी वापरतोय…निर्लज्जपणाने आता ठरलेली गोष्ट तुम्ही बाहेर आल्यावर नाकारली, हे तुमचं हिंदुत्व आहे का,’ असा सवाल करत मुख्यमंत्र्यांनी भाजपवर हल्ला चढवला.
मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप नेत्यांनी चांगलाच गोंधळ घातला. सुधीर मुनगंटीवार यांनी आक्रमक होत या शब्दावरून मुख्यमंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही सदस्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचा एकरी उल्लेख केला यामुळे ठाकरे यांनी त्याचं भाषण काही काळ थांबवल होत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत दिलगिरी व्यक्त केली, ‘उद्धव ठाकरे हे विशिष्ट पक्षाचे जरी असले तरी ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री पद हे सन्मानीय पद आहे यामुळे जर कोणी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो.’ असे ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ही’ तर ‘एकटे देवेंद्र फडणवीस काय करणार?’ असं म्हणणाऱ्यांना सणसणीत चपराक आहे : मोहोळ
- खळबळ! मनसेमुळे जमीन बळकावणाऱ्या बीडमधील ‘प्रतिष्ठितां’वर गुन्हा
- आ.पवारांचे उपोषण मागे, महसूलमंत्री विधानभवनातच घेणार बैठक
- ‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना चौकातलं भाषण आणि विधानसभेतील भाषण यातला फरक समजला नाही’


