Share

‘ही’ तर ‘एकटे देवेंद्र फडणवीस काय करणार?’ असं म्हणणाऱ्यांना सणसणीत चपराक आहे : मोहोळ

Published On: 

पुणे- विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन दिवस विरोधकांची चांगलीच हवा पाहायला मिळाली. दुसरा दिवस तर सर्वाथाने विरोधी पक्षाचा होता.या अधिवेशनात महाविकास आघाडी सरकार समोर अडचणींचा डोंगर दिसून येत आहे. कारण सत्ताधारी मंत्र्यांवर लागलेल्या आरोपांवरुन विरोधक सरकारला धारेवर धरणार असल्याचं चित्र आहे.

विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर भाषण करत राज्य सरकारच्या भोंगळ कारभाराचा पाढा वाचला. यावेळी विरोधकांच्या मागणीवर राज्य सरकारनं सभागृहात चर्चा घेऊन निर्णय होईपर्यंत राज्यात वीज तोडणी थांबवण्याचा आदेश देण्यास भाग पाडले.

देवेंद्र फडणवीस यांनी जवळपास पाऊणे दोन तास भाषण करत सरकारच्या कारभाराची चिरफाड केली. काही अपवाद वगळता सत्ताधारी बाकांवरुनही भाषणा दरम्यान विरोधाचा फारसा आवाज आला नाही.राज्यपालांच्या भाषणावरील अभिनंदन प्रस्ताव मांडताना फडणवीसांनी राज्य सरकारने राज्यपालांना चौकातलं भाषण दिल्याची टीका केली. याशिवाय त्यांना राज्य सरकारने करोना संकटात घोटाळा केल्याचा गंभीर आरोपही केली.

फडणवीस यांनी कोरोना, शेतकरी, कायदा सुव्यवस्था, पूजा चव्हाण प्रकरण, मेहबूब शेख प्रकरण, मेट्रो कारशेड अशा अनेक विषयांवर सरकारवर टीकेचा भडीमार केला.संत नामदेव महाराज यांचा सरकारला विसर पडला. कोणतेही कार्यक्रम सरकारने घेतले नाही. संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत सावता महाराज, संत सोपानकाका महाराज, संत मुक्ताई यांच्या समाधीचे ७२५ वे वर्ष आहे. सरकारची वारकरी संप्रदायावर नाराजी का? शिवजयंती आणि मंदिर यामुळेच कोरोना वाढतो का?असा सवाल देखील केला.

दरम्यान,पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी फडणवीस यांच्यावर स्तुतिसुमने उधळत खासदार सुप्रिया सुळे यांना टोमणा मारला आहे. देवेंद्रजींनी गेल्या दोन दिवसांत गाजवलेलं विधिमंडळ अधिवेशन ही, ‘एकटे देवेंद्र फडणवीस काय करणार?’ असं म्हणणाऱ्यांना सणसणीत चपराक आहे. सामान्य जनतेच्या प्रश्नांवर अतिशय मुद्देसूद, संसदीय चौकटीला धरून आणि तितक्याच प्रभावीपणे केलेल्या मांडणीला तोड नाही असं महापौर म्हणाले आहेत.

खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना टीका केली होती.“देवेंद्र फडणवीस म्हणाले होते शरद पवारांनी रिटायर्ड व्हावं. छान मार्गदर्शन केलं होतं. मात्र महाराष्ट्राने शरद पवारांना रिटायर्ड करायचं नाही हे ठरवलं होतं. त्यामुळे ‘अकेले देवेंद्र फडणवीस क्या करेंगे ? महाराष्ट्र एक तरफ और देवेंद्र फडणवीस एक तरफ’. शरद पवार म्हटले असते मी आता देवेंद्र फडणवीस बोलत आहेत तर रिटायर्ड होतो, परंतु महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात तसं नाही.”असं भाष्य सुप्रिया सुळे यांनी केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!