Share

रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा – पडळकर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई- राज्यात कोरोनाने ठीमान घातले आहे. अनेक जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोना रुग्णांची अवस्था अत्यंत वाईट असून, योग्य उपचाराअभावी बहुतांश रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत. रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागत आहेत.

रेमडेसिव्हिर इंजेक्शनची उपलब्धता नसल्याने गरीब रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. राज्य सरकार उपलब्धतेचे कितीही दावे करीत असले, तरी रुग्णालयाकडून मात्र टंचाईचे कारण सांगितले जात आहे. तर काही ठिकाणी रेमडेसिव्हिर इंजेक्शन महाग असून, सर्वसामान्य गरीब रुग्णांना बाहेरून इंजेक्शन विकत घेणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याचे समोर येत आहे.

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी याबाबत आवाज बुलंद केला आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोना बाधितांची संख्या जास्त असून रुग्णांवर संजीवनी म्हणून काम करणारे औषध रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज असताना त्या औषधाचा कृत्रिम तुटवडा भासवून औषध वितरक त्याचा काळाबाजार करीत आहेत.काळाबाजार करणाऱ्या वितरकांचे परवाने रद्द करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी पडळकर यांनी केली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेशजी टोपे यांना याबाबत त्यांनी पत्र लिहले आहे.

दरम्यान,राज्यात काल एका दिवसात नवीन कोरोना रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट नोंदविली असून २६ हजार ४४० रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ११ हजार ४१६ नवीन रुग्णांचे निदान झाले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८२.७६ टक्के एवढे झाले आहे. राज्यातील उपचाराखाली असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस कमी होत आहे. सध्या २ लाख २१ हजार १५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!